Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

सेवानिवृत्ती निमित्त डाॅ. अरविंद बिराजदार यांचा सपत्नीक सत्कार

मुरुम/प्रतिनिधी
उमरगा  तालुक्यातील मुरुम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील भौतिकशास्ञ विषयाचे प्राध्यापक डाॅ. अरविंद आण्णाराव बिराजदार व सौ. मलम्मा अरविंद बिराजदार यांचा सपत्नीक सेवानिवृत्ती निमित्त  सत्कार सोहळा श्री माधवराव पाटील महा विद्यालयात शुक्रवार(ता.३१)रोजी आयोजित करण्यात आला.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. अशोक सपाटे यांच्या हस्ते डाॅ. अरविंद बिराजदार यांचा सपत्नीक  फेटा,शाल, पुष्पहार घालून यथोचित सत्कार करण्यात आली.

प्रारंभी कै.माधवराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करुन सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला.यावेळी श्री माधवराव पाटील महाविद्यालयाचे डाॅ. रवी आळंगे, डाॅ.अविनाश मुळे, डाॅ.सुजित मटकरी,डाॅ.सोमनाथ बिराजदार, डाॅ. अविनाश बिराजदार, डाॅ.सुभाष हुलपल्ले, डाॅ. भिलशिंग जाधव,प्रा गोपाळ कुलकर्णी, प्रा राजीव शाळु,सेवानिवृत शिक्षक ज्ञानेश्र्वर वाघमारे, सेवानिवृत प्रा.राजेद्र वाकडे,सेवानिवृत प्रा.राजेश दलाल व श्री माधवराव पाटील महाविद्यालय,प्रतिभा निकेतन कनिष्ठ महाविद्यालय,मुरुमचे सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी मित्र परिवार  बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments