Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

विकास उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९६ टक्के

मुरुम/प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील अतनूर येथील विकास उच्च माध्यमिक विद्यालयांचा विज्ञान शाखेचा निकाल ९६ टक्के तर कला शाखेचा निकाल ७५ टक्के लागला. विज्ञान शाखेतील एकूण प्रवेशित विद्यार्थी ९० पैकी विशेष प्राविण्‍यासह ७ विद्यार्थी प्रथम, श्रेणीत ५४ द्वितीय श्रेणी, २४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेतून प्रथम कु.अंजुम म.सलीम शेख ७७.६७ टक्के, द्वितीय घोगरे वृंदावनी मारोती ७७.३३ टक्के, तृतीय कु.अनंतवाळ रागिनी ७६ टक्के व वाकळे वैष्णवी ७६ टक्के, व्यंकटेश बालासाहेब शिंदे ७३ टक्के मार्क मिळवून यांनी यश संपादन केले.

सर्व गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे सचिव शिरीष पाटील राजूरकर, अध्यक्ष बाबुराव पत्तेवार सावकार व प्राचार्य सौ.एस.डी.पवार यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments