Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड महाराष्ट्र राज्य समितीच्या उपाध्यक्षपदी धाराशिवचे शशिकांत खुने यांची निवड

धाराशिव:- शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड महाराष्ट्र राज्य कार्यकारणीची बैठक युवराज छत्रपती संभाजीराजे महाराज यांचे अध्यक्षतेखाली जुना राजवाडा कोल्हापूर येथे पार पडली. 

विश्ववंदनीय युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या वर्षपूर्तीचा यंदाचा रायगड वर होणारा सोहळा जागतिक स्तरावर पोहोचविण्याचा आणि हा सोहळा राष्ट्रीय सण म्हणून लोकोत्सव व्हावा अशी अपेक्षा अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या येथील नियोजन बैठकीत युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली.जुना राजवाडा येथील भवानी मंडपात शुक्रवारी समितीतर्फे  रायगडावरील सोहळ्यासाठी नियोजन बैठक पार पडली. यावेळी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगडसाठी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या.

समितीचे अध्यक्ष म्हणून कोल्हापूर येथील दैनिक सकाळचे ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडेकर यांची नियुक्ती करण्यात आली.तसेच समितीचे उपाध्यक्ष म्हणून शिवराज्याभिषेक सोहळा समिती, धाराशिवचे माजी अध्यक्ष श्री. शशिकांत (नाना) दगडू खुने यांची सर्वसम्मतीने निवड करण्यात आली.यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून अध्यक्ष उपाध्यक्षा सह 40 सदस्यांची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

या बैठकीसाठी संयोगिताराजे छत्रपती,यौवराजकुमार शहाजीराजे छत्रपती,समितीचे मावळते अध्यक्ष श्री फत्तेसिंह सावंत, कार्याध्यक्ष हेमंत साळोखे,इंद्रजीत सावंत, विजय देवणे,प्रवीण हुबाळे,अमर पाटील, सागर यादव,सुखदेव गिरी,इंद्रसेन जाधव,संजय पोवार, विनायक फाळके,राम यादव,विष्णू जोशीलकर, अतुल चव्हाण,सत्यजित भोसले, चैत्राली कारेकर यांचे सह महाराष्ट्रातील शेकडो शिवभक्त बैठकीस हजर होते. युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी व समितीचे मावळते अध्यक्ष श्री फत्तेसिंह सावंत यांनी शशिकांत खुणे यांचे उपाध्यक्षपदी निवडीबद्दल अभिनंदन केले आहे*

Post a Comment

0 Comments