Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

छत्रपती संभाजीराजे ग्रुपचा अनोखा उपक्रम ; मिरवणुकीत शिवकालीन मर्दानी खेळाचा देखावा

 
मुरुम/प्रतिनिधी 
उमरगा तालुक्यातील मुरुम शहरातून छत्रपती संभाजी महाराजांच्या मुर्तीची गुरुवारी (ता. २३)  रोजी भव्य मिरवणूक काढण्यात आली. 

या मिरवणुकीत प्रमुख आकर्षण ठरले ते शिवकालीन मर्दानी खेळ, पारंपरिक वेशभूषा करुन अनेक प्रकारचे खेळ सादर करण्यात आले. यात तलवारबाजी, दांडपट्टा, भाला, अग्नीचक्र अशा अनेक शिवकालीन खेळांची प्रात्यक्षिके सादर करून शिवभक्तांची नागरिकांची मने जिंकली. महाराष्ट्रातील शिवकालीन युद्ध कला जगभर प्रसिद्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या या युद्ध कलेला मर्दानी खेळ म्हणून ओळखले जाते. याच मर्दानी खेळांची प्रदर्शन देखाव्याच्या माध्यमातून शहरातील छत्रपती संभाजीराजे ग्रुपच्या वतीने छत्रपती शंभूराजांच्या जयंती निमित्त मिरवणुकी दरम्यान शहरातील मिरवणूक मार्गावरील सर्वच चौकात आयोजित करून शहरवासीयांचे मने जिंकली.

 शिवरायांनी स्वराज्य बांधणीत गनिमी कावा आणि मर्दानी युद्ध कलेवर आपल्या मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापन केले. याच युद्ध कलेच्या जोरावर शत्रूंना गुडघे टेकायला भाग पाडले. मुलगा चालायला लागला की युद्धकलेच शिक्षण देण्यास सुरुवात होत असे. पुरुषांप्रमाणेच महिलाही युद्धकला कौशल्ये आत्मसात करत असतं. स्वराज्यातील अनेक शूरवीरांनी रणांगण गाजवून स्वराज्याचे रक्षण केले. कालांतराने ही युद्ध कला मर्दानी खेळांच्या रूपात पुढे आली आणि याच कलेचा वारसा जपण्याच्या प्रामाणिक हेतूने छत्रपती संभाजी राजे ग्रुपच्या वतीने शंभूराजांच्या जयंती निमित्त मिरवणुकीत कराड येथील हिंदुतेज शिवकालीन दांडपट्टा आखाड्याच्या कलाकारांनी मुख्य प्रशिक्षक अभिजीत गिरी नेतृत्वात मर्दानी कलेच्या खेळांचे देखाव्याच्या स्वरूपात आयोजन केले. दरम्यान मिरवणुकीत पुरुषांबरोबर तरुणींनीही या मर्दानी खेळात सहभाग नोंदवला. अगदी नऊवारी साडी नेसून कपाळावर चंद्रकोर लावून तरुणी या खेळांमध्ये पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढे होत्या. विशेष म्हणजे हातात काठी, ढाल, तलवार असे एखादे शस्त्र घेतले की जणू काही त्यांच्या अंगातील रक्तच या ठिकाणी सळसळत होते, इतक्या सुंदर व अप्रतिम मर्दानी कलेचे त्यांनी सादरीकरण केले. मिरवणूकीची सुरुवात मुरूम शहरातील छत्रपती संभाजीनगर येथून झाली. शहर प्रदक्षिणा पुर्ण करुन पुन्हा छत्रपती संभाजीनगर येथे मिरवणूकीची सांगता झाली. शिवशंभूच्या नामाचा जयघोषाने आसमंत दुमदुमला या मिरवणूकीत लहान मुले, मुली, गावातील शिवभक्त डोक्यावर भगवे फेटे बांधुन मिरवणूकीत सहभागी झाले होते. 

यावेळी डिजेच्या तालावर तरुणाईने ठेका धरला आणि फटाक्यांची आतषबाजी यामुळे संपूर्ण मुरुम शहर शिवमय झाले होते. शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी मुरुम पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप दहिफळे व पवनकुमार इंगळे, यांच्या  मार्गदर्शनाखाली पांडुरंग पवार, मिलिंद साकंळे, रमांकात परीट, अजय माळी, बळीराम लोंढे यांच्यासह इतर पोलिस बांधवांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.            

मुरूम, ता. उमरगा येथील संभाजी महाराज यांच्या मिरवणुकीत शिवकालीन मर्दानी खेळाचा देखावा व विविध कलाप्रकार सादर करताना शिवभक्त

Post a Comment

0 Comments