Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

मसला (खुर्द)येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या शाखेचे उद्घाटन ; नामफलकाचे करण्यात आले अनावरण

काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील मसला (खुर्द) येथे रविवार  दि.16 रोजी येथील  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दुपारी 4 वाजता राष्ट्रवादी   काँग्रेस (शरद  पवार गट)पक्षाच्या शाखेचे उद्घाटन एसटी  महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा पक्षाचे जेष्ठ नेते जीवनराव गोरे व राष्ट्रवादी  काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणाताई सलगर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) शाखा नामफलकाचे अनावरणही करण्यात आले. यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कार्यकर्त्यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही उपस्थित नेतेमंडळींना दिली.

यावेळी एसटी  महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, राष्ट्रवादी  काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणाताई सलगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक अध्यक्ष शरद जगदाळे माजी सभापती दिगंबर खराडे,विभाग, कार्याध्यक्ष शहाजी कसबे,गणेश नन्नवरे संजय मेटे आदी मान्यवरांसह गावतील उपसंरपंच राम खराडे, शाखेचे अध्यक्ष कालिदास जाधव,उपाध्यक्ष नबिलाल सय्यद,सचिव कृष्णा शेडगे, कार्याध्यक्ष दत्ता काबंळे, जबार सय्यद, विकास वडवराव, सुनिल मोरे,आप्पा नागळे,राम मोरे,लहू गायकवाड,गणेश सुरवसे,आप्पा वडवराव आदी राष्ट्रवादी  काँग्रेसचे कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते‌.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर/काटी
9923005236

Post a Comment

0 Comments