Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत 15 लाभार्थी शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे, बेन सेल्फ सल्फर युक्त खत, ट्राइकोडर्मा राइजोबिएन मोफत वाटप

काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे सोमवार दि.17 रोजी सकाळी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकरी  गट पिक प्रात्यक्षिक अंतर्गत  प्रभाग क्रमांक पाच मधील 15 लाभार्थी शेतकऱ्यांना केडीएस 753 सोयाबीन बियाणे एक बॅग,बेन सेल्फ सल्फर युक्त खत, व ट्राइकोडर्मा राइजोबिएनचे पाकीट विविध  मान्यवरांच्या उपस्थित माजी चेअरमन  सयाजीराव देशमुख व प्रगतशील शेतकरी प्रदीप साळुंके यांच्या  हस्ते मोफत वाटप करण्यात आले.

आपल्या देशात अनेक असे शेतकरी आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे आणि ते बियाणे खरेदी करू शकत नाहीत.शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2024 सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी  विविध योजना राबवित आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत शेतकरी गट पिक प्रात्यक्षिक अंतर्गत शेतकऱ्यांना मोफत बियाणे ही योजना राबविण्यासाठी कृषी सहाय्यक लोंढे व त्रिगुण कृषी सेवा केंद्राचे सर्वेसर्वा किर्ती जमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जगदंबा, त्रिगुण व सह्याद्री शेतकरी बचत गटाचे समन्वयक ज्ञानेश्वर गुरव, सह्याद्री बचत गटाचे अध्यक्ष जयाजी देशमुख यांनी पुढाकार घेतला होता.

यावेळी माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, प्रगतशील शेतकरी प्रदीप साळुंके, प्रकाश गाटे, चंद्रकांत काटे, रामेश्वर  लाडुळकर,जयाजी देशमुख, ज्ञानेश्वर गुरव, मनोज हंगरकर आदी मान्यवरांसह लाभार्थी  शेतकरी मधुकर वीर, हरी गाटे, दिपक गाटे, सुमन मासाळ, बाबासाहेब गाटे, रविंद्र गुंड, बालाजी सावंत, सुधाकर फंड आदी मान्यवर उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments