काटी/उमाजी गायकवाड
समृद्ध व आनंदी जीवनासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक असून तापमान वाढ रोखण्यासाठी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे, असे प्रतिपादन धर्मादाय आयुक्त श्रीमती आर.आर.कोरे यांनी तुळजापूर तालुक्यातील काटी येथे मंगळवार दि.18 रोजी सकाळी येथील सावित्रीबाई फुले मागासवर्गीय सामाजिक शैक्षणिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित मनाल इंग्लिश स्कूलच्या वतीने आयोजित वृक्ष लागवड कार्यक्रम प्रसंगी त्यांनी मत व्यक्त केले.
येथील शिक्षणप्रेमी कै.हारुण शेख यांच्या जयंती व 5 जून पर्यावरण दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष तथा उपसरपंच जुबेर शेख यांच्या संकल्पनेतून धनगर स्मशानभूमी ते मनाल इंग्लिश स्कूल पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा 251 विविध वृक्षांचे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. धिरज पाटील, धर्मादाय आयुक्त श्रीमती आर.आर.कोरे, तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख,संस्थेचे अध्यक्ष जुबेर शेख,राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, उद्योजक सत्यजित देशमुख, रामेश्वर लाडुळकर आदी मान्यवरांच्या हस्ते सामुहिक पध्दतीने वृक्षारोपण रोपन करण्यात आले.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ,महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर संस्थेच्या वतीने ढोल ताश्यांच्या गजरात उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना श्रीमती आर.आर.कोरे म्हणाल्या की, ‘‘समृद्ध व आनंदी जीवनासाठी पर्यावरण रक्षण काळाची गरज आहे. वाढत्या औद्योगीकरणामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ होऊन पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. त्यासाठी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. झाडे हवेतील कार्बनडाय ऑक्साइड शोषून शुद्ध ऑक्सिजन निर्माण करतात. तसेच वृक्षांमुळे पाऊसही जास्त पडतो. वृक्षांचे संवर्धन केले तरच भविष्यातील पर्यावरण अबाधित राहील.त्यामुळे प्रत्येकांनी वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष जुबेर शेख यांनी 251 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आलेल्या सर्व रोपांचे संवर्धन करणार असल्याची ग्वाही उपस्थितांना दिली.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
कठोर परिश्रम, चिकाटी,आणि मेहनत केल्यास हमखास यश
----श्रीमती आर.आर.कोरे
यावेळी 10 वी 12 वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना श्रीमती कोरे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, चिकाटी,आणि मेहनत केली तर नि:संशयपणे उचित क्षेत्रात हमखास यश मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दृढनिश्चयाने कोणत्याही क्षेत्रात यश मिळविण्यासाठी प्रचंड मेहनत, उचित ध्येय व दृढनिश्चय केल्यास निश्चित यश मिळेल असे मत व्यक्त करीत प्रत्येक विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवावी असे आवाहन केले.
यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.धिरज पाटील, धर्मादाय आयुक्त श्रीमती आर.आर.कोरे, तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख,संस्थेचे अध्यक्ष जुबेर शेख,राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, उद्योजक सत्यजित देशमुख, रामेश्वर लाडुळकर, शाळेच्या मुख्याध्यापिका लक्ष्मी सुरडकर, ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे, चंद्रकांत काटे, प्रकाश गाटे,भैरी काळे, रामहरी लोंढे, बाळासाहेब भाले, तानाजी हजारे, भोलेनाथ बनसोडे, गौरीशंकर नकाते, नजीब काझी, सतिश आगलावे, सुहास साळुंके,संजय कदम, सहशिक्षक रुबिना शेख, अश्विनी जाधव,अक्षता शिंदे,दिपाली जाधव,आयेशा बेग आदी मान्यवर उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236
0 Comments