काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील सरस्वती विद्यालयात नवीन प्रवेशित विद्यार्थ्याचे पुष्पगुच्छ व पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. तसेच दहावी,बारावी व नीट परीक्षेत उत्तम प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा फेटा, शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यात बारावीत यश प्राप्त केलेले विद्यार्थी तेजश्री मुसळे, राजनंदिनी कदम, रेश्मा नवगिरे, सोनाली जाधव तसेच दहावीत यश प्राप्त केलेले विद्यार्थी स्मिता सिद्धगणेश,श्रद्धा सावंत, सुयश कपाट, महेश मसुते, विराज चौगुले, वर्धा पिंपळेकर, दिव्या मोरे,ओम लोहार, श्रद्धा धनके, कार्तिक कोंडे, सावरिया रणसुरे या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सरस्वती विद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री मसुते, तसेच दीक्षा नेटके नीट परीक्षेत उत्तम प्राविण्य मिळवले आहे. त्यांचा सुद्धा या प्रसंगी सत्कार करण्यात आला.
ग्रामीण भागातील सरस्वती विद्यालयाची यशाची परंपरा कायम
--प्राचार्य सुहास वडणे
प्रशालेचे प्राचार्य सुहास वडणे यांनी आपल्या भाषणात प्रशाला ग्रामीण भागात असून सुद्धा आपली यशाची परंपरा कशी कायम ठेवली आहे याविषयी मार्गदर्शन केले.संस्थेचे अध्यक्ष श्री.मसुते बसवण्णाप्पा यांनी सुद्धा आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. प्रमुख उपस्थिती संस्थेचे संचालक बाळासाहेब जगताप, माजी सैनिक शिवाजी सावंत, दत्ता मोरे, नेटके, रणसुरे, जाधव पर्यवेक्षक माडजे सर इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राऊत सर यांनी केले, प्रास्ताविक साळूंखे सर यांनी केले तर आभार मसुते सर यांनी मांडले.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज धाराशिव
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236
0 Comments