Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

वाणेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुलाब पुष्प देवून केले विद्यार्थ्यांचे स्वागत

काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर  तालुक्यातील वाणेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील प्रथम सत्रास शनिवार  दि.15 जून पासून सुरूवात झाली आहे. नविन गणवेष,नविन शाळा, पाठीवर दप्तराचे ओझे, हातात वॉटर बॅग, अशा अवस्थेत चिमुकले शाळेत दाखल झाले होते. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने मुख्याध्यापकासह शिक्षकांनी विद्यार्थ्याचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले आहे. त्याचबरोबर प्रधानमंत्री पोषण शक्ती अभियानांतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मसालेभात व बासुंदीची मेजवानी देण्यात आली. वाणेवाडीतील शाळा विद्यार्थ्यानी गजबजून गेली होती.
 
सुटीच्या दिवसात अनेक विद्यार्थी नातेवाईकांकडे जाऊन सुटीचा आनंद लुटतात. मात्र, दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी उन्हाळ्याची सुटी संपून शनिवार दि.15 जून पासून शाळेची पहिली घंटा वाजली आहे. विद्यार्थ्याच्या प्रवेशोत्सवा निमित्त शाळेच्या पहिल्याच दिवशी नवागत विद्यार्थ्याचे गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले.


विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचेे वाटप
सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद प्रशासनाने सर्व शाळांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप केले होते. दरम्यान शनिवारी शाळेचा पहिला दिवस असल्याने शाळेचे मुख्याध्यापक  राहुल गवळी, सहशिक्षक राजेंद्र कापसे, गोरख माळी, नितीन माळी व पालकांच्या उपस्थितीत शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वाटप केले. पहिल्याच दिवशी पुस्तके मिळाल्याने  शाळेतील विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर आनंद  दिसून येत होता.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा.....
Only न्युज धाराशिव
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर/काटी
9923005236

Post a Comment

0 Comments