Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

दहिवडीतील उपसरपंच चिरंजीवासह काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजप मध्ये प्रवेश

काटी/उमाजी  गायकवाड 
तुळजापूर विधानसभेचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तुळजापूर  तालुक्यातील दहिवडी येथील उपसरपंच सौ. साधना भागवत मंडलिक  यांचे चिरंजीव मेघराज मंडलिक यांच्यासह जवळपास  डझनभर कॉंग्रेस  कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तालुक्याच्या विकासासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचे या कार्यकर्त्यांनी सांगितले. हा पक्ष प्रवेश सोहळा विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तुळजापूर येथील भाजप कार्यालयात पार पडला.

यांनी केला भाजपमध्ये पक्ष प्रवेश 
मेघराज मंडलिक, श्रीधर अंबुरे, शिवशंकर गाटे, निलेश चिवटे, विकास ताटे, शुभम पवार, धिरज पवार,जयराज मंडलिक आदी...

येणाऱ्या सर्व निवडणुकीत आपण भाजपाच्या  पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार असून भाजपचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी यावेळी  दिला.

यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष (दादा) बोबडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, आदेश कोळी, माजी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, वाणेवाडीचे सरपंच महादेव जाधव, विजय निंबाळकर, दहिवडीचे सरपंच प्रशांत गाटे, दहिवडी ग्रामपंचायत सदस्य सचिन गाटे आदीं पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

Post a Comment

0 Comments