Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

धामणगाव येथे जाणाऱ्या भाविकांसाठी खुंटेवाडी येथील उद्योजक मोहन जाधव यांचेतर्फे फराळाचे वाटप

काटी/उमाजी गायकवाड
प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे धामणगाव ता.बार्शी येथे आषाढी एकादशीनिमित्त श्रीसंत बोधले महाराज यांची मोठी यात्रा भरते.बुधवार दि.17 रोजी धामणगाव येथे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी फराळ, शाबु,केळी,पाणी बाॅटल आदी साहित्य वाटप करण्यात आले.

 खुंटेवाडी येथील रहिवासी  तथा विराज ट्रेलरचे सर्वेसर्वा उद्योजक मोहन जाधव व कुटुंबीय यांच्यातर्फे ही फराळाची व्यवस्था करण्यात आली होती.या फराळ वाटप कार्यक्रमास शेतकरी सेवा संघाचे सचिव बळीराम जाधव,खजिनदार तात्या लांडगे,संजय जाधव, उमेश जाधव, रमेश जाधव,सौ.वैशाली जाधव,भैरीनाथ कदम,प्रणाली जाधव,सौ.वैशाली जाधव, प्रणाली जाधव आदींनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रम खुंटेवाडी बसस्थानकाजवळ पार पडला.

उद्योजक मोहन जाधव यांनी सुरु या स्तुत्य उपक्रमास माजी मंत्री दिलीप सोपल, धामणगाव देवस्थानचे मुख्य मानकरी मनुदादा बोधले, मकरंद  निंबाळकर, अनिल (काका) डिसले,धामणगावचे सरपंच एस.के. पाटील, काटीतील दिंडी प्रमुख  किर्तनकार सुनील महाराज व  वारकरी, काटीचे सरपंच सुजित हंगरगेकर, उपसरपंच जुबेर शेख, मासयाजीराव देशमुख, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत काटे,वानेवाडी  ग्रामपंच्यातील सदस्य आबा गाडवे,भैरवनाथ कदम, बाळासाहेब जाधव, कुलदीप जाधव, तानाजी जाधव, संतोष जाधव, दयानंद जाधव, किसन आचार, सुरेश आचार, रमेश जाधव,किसान जाधव, रोहन जाधव,संजय जाधव, विष्णू आचार, दत्ता आचार,लक्षीमान जाधव,बळी जाधव,आशाताई जाधव आदींनी फराळ  वाटप केंद्रास भेट देऊन या उपक्रमाचे  कौतुक केले.

Post a Comment

0 Comments