Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी ते वाणेवाडी- गावडी दारफळ रस्त्याची खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था

काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी हे गाव सोलापूर जिल्ह्याच्या सिमेलगत असून काटी- वाणेवाडी ते गावडी दारफळ रस्ता सोलापूर व धाराशिव या दोन्ही जिल्ह्याना जोडणारा सोयीचा  व जवळचा मार्ग आहे.
     
काटी ते वाणेवाडी -गावडी दारफळ रस्त्याची खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था झाली असून पावसामुळे या खड्डयांत पाणी साचून तयार झालेल्या डबक्यांतून  पादचारी व वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

देशामध्ये व राज्यामध्ये अनेक राष्ट्रीय महामार्गाचे जाळे निर्माण करून  शहरे जोडत असताना ग्रामीण भागातील रस्ते मात्र दुर्लक्षितच आहे. दळण- वळणासाठी रस्ते  अत्यंत महत्वाचे आहेत .रस्त्यांना विकासाच्या वाहिन्या संबोधले जाते परंतु ग्रामीण भाग यापासून वंचित आहे.
   
काटी ते वानेवाडी-गावडी दारफळ रस्ता हा  तुळजापूर ते पंढरपूर या तिर्थक्षेत्राला जाण्यासाठी भाविकांना जवळचा व सोयीचा मार्ग आहे. या मार्गावरून काटी , दहिवडी, खुंटेवाडी , वाणेवाडी व परिसरातील नागरिकांना बाजारपेठ तसेच शेतकऱ्यांना शेतमाल खरेदी-विक्री करण्यासाठी, बी - बियाणे, औषधे खरेदीसाठी, रुग्णांना हॉस्पिटलसाठी, विद्यार्थ्यांना शाळा- कॉलेज , दुग्ध व्यवसाय व नौकरी व्यवसायाच्या निमित्ताने या मार्गावरून सतत सोलापूरला जाण्यासाठी  वाहनांची ये-जा सुरु असते. 
    
सध्या या रस्त्याची चाळण झाली असून या रस्त्यावर मोठ- मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे अपघात होऊन प्रवाशांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात तर या रस्त्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे अपघात झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या या रस्त्याला वालीच नाही,अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
  
गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याच्या कामाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे या रस्त्यासंबधी लोकप्रतिनिधी,संबधित अधिकारी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करुन निवेदने देऊन देखील दखल घेतली जात नाही. येणाऱ्या काळात संबधित अधिकारी यांनी याची दखल घेऊन रस्त्याचे मजबुतीकरणाचे काम करावे अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा संबधित गावातील नागरिकांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments