Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

गोंधळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गणेश सातपुते तर उपाध्यक्षपदी कांताबाई सातपुते यांची सर्वानुमते निवड

काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील गोंधळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील जुन्या शालेय व्यवस्थापन समितीचा कार्यकाळ संपल्यामुळे शनिवार दि. 27 रोजी सकाळी गोंधळवाडी येथील शाळेत शाळा व्यवस्थापन समिती पुनर्रचना पालक मेळावा घेण्यात आला. सदरील मेळाव्यामध्ये नुतन शालेय व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली.

यामध्ये शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गणेश सातपुते तर उपाध्यक्षपदी  श्रीमती कांताबाई सातपुते यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीत सदस्यपदी कुंडलिक मोटे,रूपाली मोटे, मनोरमा सातपुते,नामदेव मोटे किरण रुपनर,प्रमोद मोटे तथा अनुसूचित जाती सदस्य म्हणून रेश्मा आयवळे,शिक्षणप्रेमी म्हणून धनाजी रेड्डी, व ग्रामपंचायत सदस्य सविता मोटे,यांची निवड करण्यात आली.

निवडीनंतर नुतन  शालेय  व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, व सदस्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करुन नुतन शालेय व्यवस्थापन समिती  सदस्य तथा पालक सदस्य यांच्यामार्फत शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. 

यावेळी ग्रामपंचायत सदस्य पोपटराव मोटे, माजी उपाध्यक्ष संजय मोटे, सहशिक्षक पिंपळे, लालासाहेब मगर,तोटावाड, राऊत,व समस्त शिक्षक वृंद,सर्व विद्यार्थ्यांचे पालक पुरुष व महिला,तरुण वर्ग,शिक्षक प्रेमी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments