काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील कारगिल युध्दात सहभागी झालेले सेवानिवृत्त सुभेदार मेजर जगदेवराव बाबुराव खपाले यांचा कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून युध्दात सहभागी झालेल्या भारतीयाचे सैनिकाबद्दल कृतज्ञता व कर्तव्य समजून गावातील युवकांच्या वतीने देशसेवेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी कारगिल युध्दात सहभाग घेतलेल्या सेवानिवृत्त सुभेदार मेजर जगदेवराव खपाले युध्दातील अनुभव व प्रसंग सांगितले.
यावेळी सेवानिवृत्त सुभेदार मेजर जगदेवराव खपाले, किर्ती जमदाडे, ग्रामपंचायत सदस्य संपत पंके,विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन सजंय साळुके,माजी पंचायत समिती सदस्य रामहारी थोरबोले,माजी सैनिक श्रीकांत गाटे,ज्ञानेश्वर गुरव, मनोज हंगरकर,रामदास देवकर,काकासाहेब रोडे,सुधाकर फंड,अनिल पवार,विक्रम खपाले, देव्रत खपाले,शुभम हांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments