Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

पंडितराव मोहिते यांची कृषी बँक पतसंस्था चेअरमनपदी बिनविरोध निवडीबद्दल सत्कार..

मुरुम/प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील मुरूम येथील उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शाखा व्यवस्थापक पंडितराव मोहिते यांची जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांची कृषी बँक कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित धाराशिवच्या जिल्हा चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मुरूम वतीने सत्कार सोहळा कार्यक्रम मुरूम येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रांगणात दि.२२ वार सोमवार रोजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन बापूराव पाटील यांच्या शुभहस्ते भव्यदिव्य सत्कार सोहळा पार पडला.

याप्रसंगी दत्ता चटगे, सुधाकर पाटील,गोविंद पाटील, रशीद शेख,मल्लप्पा भोसगे,सुरेश मंगरुळे,महालिंग बाबशेट्टी, देवेंद्र कंटेकुरे,राहुल गायकवाड आदींची उपस्थिती होती.प्रारंभी प्रमुख मान्यवर व डॉ.नितीन डागा यांच्या वाढदिवसानिमित्त  आयोजकांच्या वतीने येतोचित्त सत्कार करण्यात आला. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हा बँकेचे चेअरमन बापूराव पाटील यांच्या शुभहस्ते पंडितराव मोहिते यांचा येतोचित्त सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महादेव गायकवाड, प्रमोद गायकवाड,ज्ञानेश्वर वाघमारे,शहाजी बिराजदार सह, विविध कार्यकारी सोसायटी,जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी मोहिते यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उल्हास घुरघुरे, प्रास्ताविक एम एम जाधव तर आभार दत्ता चटगे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पी एस मुळे, श्यामकांत माने, मल्लिनाथ गुंडगोळे, अण्णप्पा ढंगे,राहुल मुदकण्णा आदींनी परिश्रम घेतला. कार्यक्रमासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ, जिल्हा बँकेचे कर्मचारी, सोसायटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments