Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्यासाठी रुग्णांना शोधावी लागते चिखलातून वाट!

काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे नव्यानेच बांधलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून  रुग्णांसह प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना चिखलातून वाट शोधावी लागत आहे.

काटीसह परिसरातील जवळपास अकरा गावातील रुग्णांसाठी नव्यानेच लाखो रुपये  खर्चून बांधलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे व इंदिरा नगर झोपडपट्टीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य असून, रुग्णांना खड्डे चुकवत दवाखान्यापर्यंत मार्गक्रमण करावे लागत आहे.

या प्राथमिक आरोग्य केंद्राला काटीसह परिसरातील गावे जोडली असल्याने येथे नेहमीच रुग्णांचा राबता असतो. परंतु या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून सध्या दहा -बारा दिवसांपासून सतत पावसाची संततधार सुरु असल्याने हा रस्ता चिखलमय झाला असून यातून मार्गक्रमण करताना वाहनधारकांना व पादचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. चिखलामुळे  हा रस्ता निसरडा झाला असल्याने अनेकजण पडत आहे. तसेच या रस्त्यावर मोठाअपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून रुग्णांचा जीवघेणा प्रवास थांबवावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे ‌


Post a Comment

0 Comments