Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

वेध तुळजापूर विधानसभेचे; आमदारकीसाठी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून इच्छुक उमेदवार अशोक जगदाळे यांचा काटी येथे गावभेट दौरा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

काटी/उमाजी  गायकवाड
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेश कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे यांच्या नावाची तुळजापूर विधानसभा मतदारसंघ संघातील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आमदारकीसाठी चर्चा होताना दिसत आहे. त्यांचे तुळजापूर विधानसभा मतदारसंघात गाव भेटी दौरे होत असून लोकांमधून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे. 

आजवरच्या तुळजापूर विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे वर्चस्व दिसून आले आहे. परंतु विधानसभा म्हटलं की सर्वच पक्षांकडून तयारी सुरु करण्यात येते आणि त्याअनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा तुळजापूर विधानसभेचे इच्छुक उमेदवार अशोक (भाऊ) जगदाळे यांनी तुळजापूर तालुक्यातील काटी येथे रविवार दि. 21 रोजी सायंकाळी भेट देऊन महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधून चाचपणी केली. यावेळी कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आदी महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. 

तुळजापूर विधानसभेत महायुती व महाविकास आघाडीचे अस्तित्व
राज्यातील राजकीय स्थित्यंतराचे पडसाद तुळजापूर विधानसभेतही पडल्याचे दिसून आले. प्रथम शिवसेना व नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेली फूट यांचे पडसाद तुळजापूर विधानसभेत चांगलेच उमटले होते. परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तुळजापूर विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीतील  शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकरांना तब्बल 54000 हजार मतांचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे येथील महाविकास आघाडीतील कार्यकर्तेही चांगलेच ॲक्टीव्ह झाल्याचे दिसत आहे. त्यादृष्टीने राजकीय  दृष्ट्या नेहमीच चर्चेत राहणारा तुळजापूर विधानसभा मतदारसंघातही विधानसभेचे वारे वाहू लागले आहे. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस अशोक (भाऊ)जगदाळे यांनी काटीतील महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांशी उमेदवारी बाबत सुसंवाद साधला.

यावेळी पंचायत समिती सदस्य संजय देशमुख सरपंच सुजित हंगरगेकर, उपसरपंच जुबेर शेख,माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, प्रदीप  साळुंके, प्रकाश गाटे, चंद्रकांत काटे, सत्यजित देशमुख,अजय देशमुख, रामेश्वर  लाडुळकर, वसंत हेडे, रामहरी लोंढे, अमोल  गावडे,भैरी काळे, तानाजी हजारे, धनाजी गायकवाड, विकास हंगरकर, सुनिल गायकवाड, रामदास  देवकर,भैरवनाथ कदम, सचिन भोजने, दत्ता हंगरगेकर, बापू चव्हाण आदींसह महाविकास आघाडीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments