Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

मनुष्याने स्वतःच्या अस्तित्वासाठी चांगल्या गुणांचा स्विकार करावा--राजयोगिनी अनिता करवा

 

मुरूम/प्रतिनिधी
 प्रत्येक व्यक्तीमध्ये गुण-अवगुण असतात परंतु जो स्वतःचे चांगले गुण शोधून समाजात जगतो. त्याचे व्यक्तिमत्त्व सकारात्मक बनते. ज्यामुळे व्यक्तीचे विचार, वर्तन, आचरण  समाजाभिमुख झाल्याने ते व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावशाली आणि आदरणीय बनते, ज्यामुळे समाजात त्या व्यक्तीला मान-सन्मान मिळतो. तेव्हा प्रजापिता विश्वविद्यालय हे मनुष्यमात्रामध्ये शांती, संयम्, स्नेह, बंधूभाव, माणूसकी जोपासून विश्वशांतीचा संदेश देण्याचे महान कार्य करते. तेव्हा माणसाने स्वतःच्या अस्तित्वासाठी चांगल्या गुणांचा स्विकार करावा, असे प्रतिपादन बार्शीच्या ब्रह्मकुमारी राजयोगिनी  अनिता करवा बहिणजी यांनी केले.                             
मुरुम येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्रात डॉ. नितीन डागा यांच्या ५० व्या वाढदिवस व गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून ' मानव आणि ओम शांती परिवार ' या विशेष व्याख्यानाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शिका म्हणून रविवारी (ता. २१) रोजी त्या बोलत होत्या. यावेळी रोटरी क्लब मुरूम सिटीचे अध्यक्ष कमलाकर मोटे अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी बार्शीच्या ब्रह्मकुमारी राजयोगिनी अनिता करवा, मिस इंडिया विजेत्या श्वेता परदेशी, सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. संदिपान दहिफळे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, उमरगा अँड. प्रविण तोतला, ज्येष्ठ आरोग्य तज्ञ डॉ. राधाकृष्ण डागा, डॉ. नितीन डागा, मिनाक्षी डागा, केंद्राचे संचालक राजूभाई भालकाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.                       

ब्रह्माकुमारी राजयोगिनी अनिता दीदी यावेळी आशीर्वचन देताना म्हणाल्या की, आपण सर्वांनी मिळून आपल्या हातून अशाच पद्धतीने सेवाभावीवृत्ती ठेवून जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून सतत सत्कार्य करण्याचा संदेश त्यांनी यावेळी शेवटी दिला. यावेळी श्वेता परदेशी, प्रविण तोतला, राजू मिणियार, डॉ. राधाकृष्ण डागा आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रारंभी मुरूमच्या प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्राचे संचालक राजूभाई भालकाटे यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थिती सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. कुमारी शिवकन्या चौधरी हिने मेरे सदगुरु प्यारे तर श्रध्दा शेळके हिने शिवरतन धन पायो या गीतावर नृत्य सादर केले. सुदर्शन डागा, प्रविण डागा, अनिष डागा, रतनभाई पटेल, अनिता मिरकले, वैष्णवी दीदी, सविता भरदाळे, बाळासाहेब भालकाटे, दिलीप हंगरगे आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमास सोलापूर, धाराशिव, लातूर, उमरगा, लोहारा, दाळींब, कवठा, तावशी, कदेर, केसरजवळगासह शहरातील बहुसंख्येने माता-भगिनी व नागरिक उपस्थित होते.

 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन लोहारा सेवाकेंद्राच्या संचालिका सरिता भरदाडे तर आभार डॉ. शिल्पा डागा यांनी मानले.                           

मुरुम, ता. उमरगा येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात आयोजित    अनिता करवा दीदीच्या मार्गदर्शनाप्रसंगी कमलाकर मोटे, संदिपान दहिफळे, श्वेता परदेशी, नितीन डागा, राजूभाई भालकाटे व अन्य.

Post a Comment

0 Comments