Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलच्या बालगोपाळांची उत्साहात दिंडी

मुरूम/प्रतिनिधी
आषाधी एकादशीच्या निमित्ताने प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलच्या वतीने मंगळवार (ता. १६) रोजी रंगला बालगोपाल दिंडीचा सोहळा. विठ्ठल नामाचा गजर करीत विद्यार्थी धोतर, टोपी, विठ्ठल-रुक्मिणीच्या व वारकऱ्यांच्या वेशभूषेत   टाळ, चिपळ्या, पताका घेवून मृदुंगाच्या ठेक्यावर हरीनामाचा गजर करीत शहराच्या मुख्य रस्त्यावरती दिंडी काढण्यात आली. प्रारंभी या दिंडीचे उद्घाटन मुख्याध्यापिका अनुराधा जोशी व पर्यवेक्षक  सच्छिदानंद अंबर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रा. डॉ. पुरुषोत्तम बारवकर, संगमेश्वर लामजने, धनराज हाळळे   प्रशालेतील सर्व शिक्षकांच्या मार्गदशनाखाली विद्यार्थ्यांनी विठ्ठल-विठ्ठल असा जयघोष, मुंलीनी पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर तुळस घेवून फुगडी खेळत राम-कृष्ण हरीचा गजर करीत दिंडी काढली. 

विठ्ठल-रुक्मिणी जीवनावर आधारीत विद्यार्थ्यांनी मनोगत, गीत व नृत्य सादर केले. सुभाष धुमाळ, विरेंद्र लोखंडे, पंकज पाताळे, सागर मंडले, संगिता देशमुख, नेहा माने, शितल घोडके, सरस्वती समन, तनुजा जमादार, प्रभावती कलशेट्टी, साधना शेवाळकर, गीता सत्रे, सरस्वती जाधव, सरोजा सारणे, अश्विनी क्षीरसागर, सोनाली कारभारी, सुधाराणी शेळके, श्रीदेवी मंडले आदिंसह विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिंडी सोहळ्याचा आनंद घेतला. या दिंडीचे सुत्रसंचलन व आभार जगदीश सुरवसे यांनी मानले. 
मुरुम, ता. उमरगा येथील प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलच्या वतीने चिमुकल्यांच्या वारकरी दिंडी प्रसंगी सर्व शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थी

Post a Comment

0 Comments