Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

पुजारी नगर येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित शिवसप्ताहात महिलांच्या हस्ते पूजन

तुळजापूर:- संपूर्ण देशाचे आराध्यदैवत असलेले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त आयोजित शिवसप्ताहात तुळजापूर  शहरातील पुजारी नगरमध्ये महिलांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सर्व महिलांनी परिधान केलेल्या भगवे फेट्यांनी सर्वांचे लक्ष वेधले होते.

पुजारी नगर फाउंडेशनच्या वतीने सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत असून यंदा प्रथमच तुळजापूर शहरातील नळदुर्ग रोड वरील पुजारी नगरमध्ये  शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात  आली.

शुभांगी गणेश पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली पुजारी नगर येथे शिवजयंती उत्सव सप्ताह साजरा करण्यात आला. याप्रसंगी सुनंदा पुजारी,महादेवी पुजारी,वासंती गायकवाड,सविता पवार,दीपाली पुजारी,किरण शिंदे,वैशाली शिंदे,अश्विनी म्हेत्रे, सुरेखा जोत, सानिका पुजारी,स्वाती खोपडे,ज्योती भोसले,विशाखा चव्हाण, सुवर्णा खोपडे,सोनल क्षीरसागर,प्रिया कोळेकर आदी महिलांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments