काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दरवर्षीप्रमाणे तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या वेळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात रविवार दि. 22 रोजी शिवप्रतिमेची काढण्यात आलेली मिरवणूक आकर्षण ठरली. बालगोपाळांनी केलेल्या पारंपरिक वेषभूषा सर्वांचे लक्ष वेधत होत्या.
मिरवणुकीत "छत्रपती शिवाजी महाराज की जय " " जय भवानी जय शिवाजी" अशा जयघोषाने बालगोपाळासह सर्वजण तल्लीन झाले होते. या दिमाखदार मिरवणुकीसाठी सुंदर असा चित्ररथ तयार करण्यात आला. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी मावळ्यांच्या आणि शिवाजी महाराजांच्या पारंपरिक वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
या मिरवणुकीत विद्यार्थी,पालक, नागरिक,शिवजयंती मंडळातील सर्व शिवप्रेमी सहभागी झाले होते.
मिरवणुकीनंतर गावातील मुख्य चौकात सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी शिवगीतांवर नृत्य सादर केली. तर काही विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर भाषणे झाली.या कार्यक्रमाला गावकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि कौतुक म्हणून गावाकडून 13000 रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळचे मुख्याध्यापक थोडसरे यांनी महत्वाची भूमिका पार पाडली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सुरेखा भुतेकर यांनी केले. तसेच सर्व गावकऱ्यांचे आणि शिवजयंती मंडळाचे सहकार्य लाभले.
0 Comments