काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील युवा नेते,माजी ग्रामपंचायत सदस्य व प्रगतशील शेतकरी जितेंद्र नरसिंग गुंड हे दुबई चा कृषी अभ्यास दौरा करून नुकतेच मायदेशी परत आले आहेत.
महाराष्ट्रातील नागपूर, नाशिक, यवतमाळ, अमरावती, जळगाव,बीड,धाराशिव आदी जिल्ह्यातून तब्बल 51 शेतकरी,कृषी उद्योजक दुबई देशाच्या अभ्यास दौऱ्यासाठी गेले होते.या मध्ये 18 शेतकरी महिलांचाही समावेश होता.कृषिभूषण फेडरेशनचे चेअरमन भूषण निकम यांच्या मार्गदर्शनानुखाली हा दुबई अभ्यास दौरा संपन्न झाला.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठांची ओळख व्हावी,परदेशात कोणत्या शेतमालाची व वाणांची गरज आहे,तेथील व्यापाऱ्यांशी संवाद व्हावा,तेथे आपल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना काम करता यावे या उध्येशाने कृषिभूषण महाराष्ट्र एफ पी ओ स्टार्ट अप फेडरेशन अंतर्गत सहा दिवसांचा शेतकऱ्यांसाठी दुबई अभ्यास दौरा आयोजित केला होता.हा दौरा 13 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित केला होता.या दौर्यात जागतिक गल्फ फुड एक्सो,अल अवीर मार्केट,ड्राय फ्रुट मार्केट,मसाले मार्केट या ठिकाणी भेटी देऊन भूषण निकम व किरण वाघ यांनी चांगले मार्गदर्शन केले.तसेच विविध कृषी व्यवसायिक व बायर्स यांच्या भेटी व मिटिंग आयोजित केल्या.
बुर्झ खलिपा,दुबई माॅल,डेझर्ट सफारी,माराकल गार्डन,क्रुझ मरिना,अबुधाबी सिटी,जुमेराह मोस्कू आदी ठिकाणी भेटी दिल्या.राज्यातील विविध जिल्यासह धाराशिव जिल्ह्यातून काटीचे सुपुत्र जितेंद्र गुंड हे या अभ्यास दौर्यात सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचे भाव स्वतः ठरवता यावेत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांची माहिती व्हावी,तेथील व्यापाऱ्यांची भेट व्हावी,गल्फ देशात आपल्या शेतमाला मोठी मागणी आहे त्याचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा या उध्येशाने दुबई कृषी अभ्यास दौर्याचे आयोजन करण्यात आले होते असे जितेंद्र गुंड यांनी सांगितले.
0 Comments