Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

सावरगाव येथे शिवजयंती व भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष (दादा) बोबडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

काटी/उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे मंगळवार दि.25 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:30 ते दुपारी 1 या कालावधीत शिवजयंती व भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष (दादा) बोबडे  यांच्या वाढदिवसानिमित्त येथील बसस्थानक शेजारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

रक्तदान हेच जीवनदान", "रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान" असे समजले जाते. आजच्या तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजवणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने एस.बी. व संतोष दादा मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे याही वर्षी वाढदिवसानिमित्त मंगळवार 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:30 ते दुपारी 1 या कालावधीत सावरगाव येथे  "भव्य रक्तदान" शिबिराचे आयोजन  करण्यात आले आहे.

तरी सावरगावसह परिसरातील इच्छूक रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान करुन सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments