Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

प्रगतशील द्राक्ष बागायतदार हणमंत गवळी यांच्या द्राक्ष बागेचे तज्ञ संचालकांकडून कौतुक

काटी/उमाजी  गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) येथील प्रगतशील द्राक्ष बागायतदार तथा महाराष्ट्र  राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक हणमंत (दादा) गवळी यांच्या द्राक्ष बागेत महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ आयोजित शिवार फेरी काढून तज्ञ संचालकांकडून द्राक्ष बागेचे कौतुक केले.


तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) येथील प्रगतिशील द्राक्ष बागायतदार तथा महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक हणमंत गवळी यांना वडिलोपार्जित 5 एकर शेतजमीन होती. त्यांनी 2001 साली आपल्या शेतात द्राक्ष बाग लावण्यास सुरुवात केली.त्यांनी स्व: च्या कष्टावर 85 एकर शेत जमीन खरेदी करुन त्या क्षेत्रात सध्या 70 एकरात द्राक्ष बाग फुलवली आहे. या त्यांच्या यशामध्ये त्यांचे बंधू श्रीमंत भानुदास गवळी यांचाही सिंहांचा वाटा आहे. दरवर्षी त्यांच्या 70 एकरावरील संपूर्ण निर्यातक्षेम द्राक्ष युरोप खंडात निर्यात होत आहेत. दोन भावांच्या एकत्रित कुटुंब पद्धतीत त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडेही लक्ष दिले. त्यांचा एक मुलगा अर्जुन हणमंत गवळी बीएससी ॲग्री, मुलगी वैभवी हणमंत गवळी बीई कॉंप्युटर तर एक मुलगा समर्थ हणमंत गवळी व बंधु श्रीमंत गवळी यांची कन्या स्वेता गवळी ही प्रवरा नगर अहमदनगर येथे वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. 

त्यांच्या द्राक्ष बागेतील यशस्वी वाटचालीच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य द्राक्ष संघाचे संचालक महादेव (अण्णा ) चाकोते, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे खजिनदार शिवाजीराव पवार,सोलापूर विभागाचे अध्यक्ष  राजाभाऊ देशमुख,सचिव शंकरराव येंगुरे, संचालक डॉ. हविनाळे, शिवानंद माळी, महादेव (बप्पा) वडणे, लालासाहेब गव्हाने,श्री काकडे,   राजाभाऊ जाधव,श्री माळवधे, औसा येथील साईबाबा कृषी सेवा केंद्राचे संजय पवार आदींनी हणमंत  गवळी यांच्या द्राक्ष बागेला भेट देऊन हनुमंत  गवळी (दादा) व त्यांचे बंधू  श्रीमंत (अप्पा) गवळी या दोन्ही बंधूंचे  कौतुक करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments