Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

मंगरुळ येथे कंचेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

तुळजापूर,काटी/उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथे महाशिवरात्रीनिमित्त ग्रामदैवत श्री कंचेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त बुधवार दि.26 ते शुक्रवार 28 या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवार दि.26 रोजी पहाटे पाच वाजता श्री कंचेश्वरास अभिषेक, सकाळी नऊ वाजता श्रींच्या काठीची स्थापना, सकाळी 11 ते 3 वाजता उपवास पदार्थाचे अन्नदान व भजनाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी पाच वाजता श्रींच्या काठीची गावातील  प्रमुख मार्गावरून मिरवणूक तर रात्री नऊ ते आकरा वाजता हभप प्रतिक्षाताई करडुळे यांचे सुश्राव्य किर्तन होईल.
 
गुरूवार दि.27 रोजी पहाटे एक ते तीन वाजता मंदिर सभागृहात भजनाचा कार्यक्रम होईल.दुपारी चार ते आकरा वाजता श्रींच्या पालखीची व काठीची मिरवणूक अश्वासह शोभेचे दारूकाम व हलगी व  बॅंजोच्या निनादात होईल तर रात्री बारा वाजता श्री कंचेश्वराची महाआरती होईल.
 
शुक्रवार दि 28 रोजी सकाळी आकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.रात्री सात ते आकरा वाजत शालेय विद्यार्थ्यांचा विविध कलागुणदर्शनाचा  सांस्कृतिक कार्यक्रम होईल.

 या सर्व कार्यक्रमास मंगरुळसह  परिसरातील सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून आनंद द्विगुणित करावा असे आवाहन श्री कंचेश्वर  महाशिवरात्र यात्रा महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments