तुळजापूर/उमाजी गायकवाड
आज, महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानी पावण नगरीचे सुपुत्र तथा बहुआयामी नेतृत्व तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष देवानंद (भाऊ) साहेबराव रोचकरी यांचा वाढदिवस आहे.
माजी नगराध्यक्ष देवानंद (भाऊ) रोचकरी हे एक असे नेते आहेत ज्यांनी सामाजिक, राजकीय क्षेत्रात मध्ये मोठे योगदान दिले आहे. त्यांनी गरजू व शेतकरी, अनेक नागरिकांचे कामे करून समाजाला नवी दिशा देण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील गावागावात देवराज मित्र मंडळाची स्थापना करुन सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली आहे.
देवानंद (भाऊ) रोचकरी यांची नेतृत्वशैली खूप खास आहे. ते सामाजिक कार्याच्या माध्यमातून तालुक्यातील लोकांना एकत्र आणतात आणि त्यांच्यात नवीन उत्साह निर्माण करतात.
योग्य संधी न मिळाल्याने त्यांना अनेकदा पक्षत्याग करावा लागला, निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले.जवळच्या कार्यकर्त्यांनी साथ सोडली.परंतु ते कधीही खचून गेले नाहीत.सतत तालुक्याच्या विकासासाठी ध्यास घेतलेले नेतृत्व, लोकांना दिलेला शब्द प्रमाण मानून तो पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे, राजकीय पटलावर अनेक चढउतार अनुभवून परिपक्व झालेले लढवय्ये, सर्वसामान्यांसाठी कधीही उपलब्ध असणारे व हजारो कार्यकर्त्यांसाठी जीव की,प्राण असणारा नेता,प्रचंड लोकसंपर्क व जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अविरतपणे काम करणारे नेतृत्व म्हणून माजी नगराध्यक्ष देवानंद (भाऊ) रोचकरी यांची ओळख आहे.
विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक कार्याचा वारसा घेऊन वाटचाल करणारे नेतृत्व म्हणून ते परिचित आहेत. सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून सतत तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे. प्रचंड आत्मविश्वास,जिद्द,चिकाटी व दूरदृष्टी हे त्यांचे वेगळे गुण आहेत. राजकारणात संघर्षाशिवाय काही मिळत नाही असं म्हटलं जातं. त्यांनी या संघर्षावर मात करून तुळजापूर सारख्या शहराचे नगराध्यक्ष पद दिमाखात भूषवले. समाजवादी पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजेत यासाठी ते नेटाने काम करत आहेत. तसेच आज समाजवादी पक्षाच्या माध्यमातून त्यांचे सामाजिक कार्य अविरत सुरु आहे.
पुजारी नगर, नळदुर्ग रोड फाउंडेशनच्या वतीने मा.श्री. देवानंद (भाऊ) रोचकरी यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
यावेळी पुजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी, उपाध्यक्ष उमाजी गायकवाड, प्रा. राजेंद्र घाडगे राहुल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
आज, देवानंद (भाऊ) रोचकरी यांच्या वाढदिवसानिमित्त, पत्रकार उमाजी गायकवाड व गायकवाड परिवार काटी ता. तुळजापूर त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचे आरोग्य चांगले राहो, राजकीय क्षेत्रात त्यांना यश मिळो, त्यांचे जीवन आनंदी आणि यशस्वी होवो,आणि त्यांच्या कार्याला नेहमीच प्रेरणा मिळत राहो, अशी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो.
🎂💐🎂💐🎂💐🎂💐
शुभेच्छुक
पत्रकार उमाजी गायकवाड,
काटी/तुळजापूर
0 Comments