मंगरुळ/चांदसाहेब शेख
तुळजापूर तालुक्यातील अनेक गावात मे ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सखी अन्न सुरक्षा शेती ( पर्यावरण संतुलित शेती) प्रकल्पाच्या माध्यमातून 82 गावातून 6000 हजार अल्पभूधारक शेतकरी महिलांना खरीप हंगाम पेरणीपूर्व प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये माती परीक्षण व त्याचे प्रात्यक्षिक , मशागतीचे महत्व , बीज प्रक्रिया , बियाणे उगवण क्षमता प्रात्यक्षिक दाखवण्यात आले तसेच विविध शासकीय योजनांची सखोल माहिती देउन त्या योजनांचा कुठल्या प्रकारे लाभ घ्यावा याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
जीवामृत, दशपर्णी अर्क, अग्निअस्त्र, निमार्क या सर्वांचेही प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले
हे प्रशिक्षण महिला लीडर, मास्टर ट्रेनर, यांच्या माध्यमातून घेण्यात आले या सर्व कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन देवकन्या जगदाळे यांनी केले व तालुका समन्वयक सुकेशनी धनके यांनी यासाठी परिश्रम घेतले
0 Comments