Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

समर्थ लेजर डेंटल क्लिनिक वैरागचा 17 वा वर्धापन दिन विशेष.... मी हिरडी बोलतेय.... जरा ऐका माझेही........विशेष लेख


काटी/उमाजी गायकवाड 
दात हे आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. दात स्वच्छ राहावेत यासाठी दोनदा ब्रश करण्याचा सल्ला अनेक डेंटल डॉक्टर आपणास देत असतात. त्याशिवाय आपण जेवल्यानंतर चूळ भरणे गरजेचे असून दोनदा ब्रश करूनही दातांना काही समस्या येतात. जेवता जेवता एखादवेळी अचानक दात दुखायला लागतात परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. कालांतराने आपला दात हलतोय हे आपल्या लक्षात येतं. त्यानंतरही आपण रोजच्या धावपळीत याकडे फारसे लक्ष देतोच असं नाही. याचा परिणाम आपला दात पडतो. त्यानंतर आपण दंतवैद्याकडे जातो तेव्हा आपल्याला या समस्येचे कारण कळतं. आपण दात घासताना ते अनेकदा नीट घासले जात नाहीत तसेच प्रत्येक वेळी खाल्ल्यावर योग्य प्रकारे चुळ खळखळून भरली जात नाही त्यामुळे अनेक बॅक्टेरिया हळूहळू दातांच्या आसपास जमा होऊ लागतात. त्यामुळे तुमच्या हिरड्या आणि जबड्यांची हाड खराब होतात हे हाड आणि पर्यायाने हिरड्या कमजोर होऊन दातांवर परिणाम होतो. ही बाब आपणास वेळीच लक्षात आली तर बरे अन्यथा चांगले दात ही हलायला सुरुवात होते. निरोगी हिरड्या हा मजबूत दातांचा पाया आहे. इमारत उभारताना जसा त्यांचा पाया भक्कम बनवणे गरजेचे आहे तसेच हिरड्या मजबूत असतील तर दात दीर्घ काळ टिकतील. हिरड्यांचा आजार प्रामुख्याने दातांवर असणाऱ्या पिवळ्या थरामुळे होतो. दातांभोवतीचे जंतू पर्यायाने हिरड्यांची व हाडांची झीज करतात. 

बार्शी तालुक्यातील वैराग येथील समर्थ लेजर डेंटल क्लिनिक सर्वेसर्वा तथा हिरड्या वरील उपचार तज्ञ डॉ.शीतल बोराडे यांनी समर्थ लेजर डेंटल क्लिनिकच्या 20 जुन 2025 रोजी होणाऱ्या 17 व्या वर्धापनदिनानिमित्त आपल्या लेखणीतून हिरड्यांची काळजी व दुष्परिणाम याविषयी "मी हिरडी बोलतेय" या लेखातून रुग्णांना जनजागृतीपर सल्ला देण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे...

✍️ हॅलो, मीच बोलतेय – तुमची हिरडी!

नमस्कार मंडळी,
ओळखलंत का मला?
मी हिरडी बोलतेय….
हो, तीच जे तुमच्या प्रत्येक दाताला धरून ठेवते…तुम्हाला खाऊ, पियू,बोलू, हसू देते..

पण हल्ली फारच दुखावल्यासारखं वाटतंय… कारण तुम्ही माझ्याकडे फारसे लक्ष देत नाहीत.

तुम्ही रोज चेहरा धुता,केस विंचरता,मोबाईल साफ करता –
पण मला… तुमच्या हिरड्यांना… तुम्ही कधी वेळ दिलात का?


मी ओरडते पण तुम्ही ऐकत नाही!

कधी कधी मी सुजते,
कधी माझ्यातून रक्त येतं,
कधी मी सळसळ करते,
कधी दात हलतात,
कधी तोंडातून दुर्गंधी येते,
हे सगळं मी तुम्हाला अलार्म वाजवून सांगत असते,
पण तुम्ही म्हणता, “अरे, थोडा त्रास आहे, निघून जाईल…”

आणि दिवसामागून दिवस….मी थकत जाते,
तुमच्या दातांना धरून ठेवायची ताकद हरवते,
आणि मग दात सुटतो… 
दात कायमचा जातो.

भारतातील एक गंभीर सत्य,
तुम्हाला माहितेय का ?
आपल्या भारतात दात गळण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे माझा- हिरड्यांचा आजार.
आणि याचा प्रत्यक्ष परिणाम आपले आयुर्मान खालवण्यावर होतो….
हो अगदी बरोबर वाचलंत तुम्ही,
आणि याबरोबरच 
विविध आजार आपण निमंत्रित करत असतो…
कसे???
ते सांगते…..

मला सांगा….
तुम्ही रोज छान स्वच्छ कपडे घालता,
तुम्ही दुचाकी/चार चाकी वेळेवर सर्विस करता,
मोबाईल चार्ज करता,
पण मी…..
जे तुमचं रोज खाणं, बोलणं, हसणं, आरोग्य सांभाळते….
माझ्याकडे मात्र लक्ष द्यायला तुमच्याकडे वेळ नाही!

माझ्यामधेही तुम्ही खाल्लेल्या अन्नाचे कण बसून राहतात, कालांतराने त्याचे प्लाक आणि दाताना किड लागण्यामध्ये रूपांतर होते, परंतु तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता.

माझ्यामध्येही त्या राहिलेल्या अन्न कणांमुळे इन्फेक्शन होते, पण तुम्ही म्हणता, हे तर नेहमीच आहे. नंतर पाहू…..

हृदय, मूत्रपिंड, मेंदू जर थोडे जरी दुःखले,तर लगेच डॉक्टरकडे धावता,मग मी इतके दिवस ओरडत असताना……..
माझी दखल का घेत नाही…

माझे एक सांगणे लक्षात ठेवा——
तोंडात स्वच्छता ठेवली, 
अन्न नीट चावून खाल्ल……..
अन्नाचा प्रत्येक घास न घास रस होईपर्यंत चावून खाल्ला तर……
जीवनशैलीशी निगडित अनेक आजार तुमच्यापासून लांब राहतील, 
तुमची पचनसंस्था चांगली राहील,
आपल्या पचनसंस्थेपर्यंत खूप वेळ बारीक चावलेले,लाळ मिश्रित अन्न पोहोचले तर,
ही पचनसंस्था सर्व अवयवांचे चांगले पोषण करेल….
दैनदिन कामकाजात तुमची ऊर्जा वाढलेली असेल,
निर्सर्गाने दिलेलं आयुष्य पूर्ण निरोगी होऊन जगाल,
कसेही ओबडधोबड अन्न चावून ते का कमी करता…..
शरीर का आजारी पाडता….


आता तरी जागे व्हा……
आपले दात आणि हिरड्यांची चांगली काळजी घ्या, मौखिक आरोग्य स्वछ ठेवा, वेळोवेळी डॉक्टरांकडून तपासणी करून आपल्या दात आणि हिरड्यामधे छुपे इन्फेक्शन तर नाही ना, याची खात्री करा.
आणि 
शेवटी एक सांगायचंय…..
मी तुमच्यासोबत अखेरच्या श्वासापर्यंत राहू इच्छिते –
फक्त थोडं माझ्याकडे लक्ष द्या, थोडं मला प्रेम द्या.
माझं काम आहे आयुष्यभर दातांना धरून ठेवणं–
पण तुमचं काम आहे मला सांभाळणं.

तुमचं हसू, 
तुमचं खाणं, 
तुमचं बोलणं,
तुमचं आरोग्य – 
सगळं माझ्यावर आहे.

म्हणूनच म्हणते,
हॅलो! मीच बोलतेय – 
तुमची हिरडी..
जरा ऐका माझंही!

समर्थ लेजर डेंटल क्लिनिक वैरागच्या 17 व्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा!!

                 लेखक डॉ. शीतल बोराडे, वैराग 

लेखक:- डॉ. शीतल बोराडे, (लेजर डेंटल स्पेशालिस्ट, हिरड्यावरील उपचार तज्ञ)
समर्थ लेज़र डेंटल क्लिनिक आणि CBCT सेंटर,वैराग ता. बार्शी 
मो.नं. 9960120440

Post a Comment

0 Comments