Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

मोर्डा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नुतन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रविण सातपुते उपाध्यक्ष बालाजी कोळेकर यांचा सत्कार

तुळजापूर:-तुळजापूर  तालुक्यातील मोर्डा येथील जिल्हा परिषद प्राथमिक  शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रविण देविदास सातपुते यांची तर उपाध्यक्षपदी बालाजी गंगादास कोळेकर यांची चिठ्ठीद्वारे सर्वानुमते  निवड करण्यात आली. हि निवड प्रक्रिया बुधवार दि. 18 रोजी सकाळी पार पडली.

विस्तार अधिकारी विस्तार अधिकारी मल्लिनाथ काळे 
यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याध्यापक बाळासाहेब वाघमारे यांच्या उपस्थितीत शैक्षणिक वर्षे 2025 ते 2027 सालासाठी झालेल्या पालक सभेच्या मेळाव्यात बुधवार  दि.18 रोजी  ही निवड प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या निवड प्रक्रियेत अध्यक्ष  उपाध्यक्ष पदासाठी चार जण इच्छुक होते.चार चिठ्ठ्या टाकून प्रशालेतील विद्यार्थ्यांकडून चिठ्ठी काढून अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड करण्यात आली. यावेळी सभेत विविध समित्या गठित करण्यात आल्या.यावेळी 2025-26 ते 2025-27 या दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी  शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सातपुते  यांची तर उपाध्यक्षपदी कोळेकर यांची निवड करण्यात आली. 

निवडीनंतर बुधवारी सायंकाळी मोर्डा गावचे माजी सरपंच राजाभाऊ शेंडगे यांच्या तुळजापूर येथील निवासस्थानी नुतन अध्यक्ष सातपुते व उपाध्यक्ष कोळेकर यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.

यावेळी नूतन अध्यक्ष प्रविण  सातपुते यांनी सर्वांच्या सहकार्याने शाळेच्या विकासासाठी आदर्शवत काम करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी मुरलीधर पाटील,सुरेश कोळेकर,हरिश्चंद्र कोळेकर, प्रथमेश सुरवसे,राजाभाऊ शेंडगे, आकाश सुरवसे,महेश कोळेकर, राहुल जाधव, शुभम शेंडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments