काटी/उमाजी गायकवाड
बहुजनांच्या वेदनांना साहित्यातून वाचा फोडणारे आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी झगडणारे तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये आपल्या शाहिरीतून योगदान देणारे लोकशाहीर साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती तुळजापूर तालुक्यातील काटी येथील ग्रामपंचायत कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच लोकमान्य लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले.
प्रारंभी सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर व माजी सरपंच शामराव आगलावे व प्रदीप साळुंके यांच्या हस्ते साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी विविध राजकीय पक्ष,संघटनेचे पदाधिकारी, ग्रामस्थांनी अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक याच्या प्पुरतिमेचे पूजन करुन अभिवादन केले.
यावेळी सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर,माजी सरपंच शामराव आगलावे, उपसरपंच संपत पंखे, माजी सरपंच अशोक जाधव, अनिल गुंड,चंद्रकांत काटे, दादा बेग, प्रकाश गाटे, मकरंद देशमुख, भैरी काळे, वसंत हेडे, भोलेनाथ बनसोडे, संजय महापुरे, सत्यवान बोराडे, गोकुळ सोनवणे, दलित मित्र नंदू बनसोडे, शिवलिंग घाणे,मंजूर कुरेशी,महेश कांबळे,भैय्या कांबळे, किरण जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा
मुख्य संपादक
Only न्यूज धाराशिव
9923005236
0 Comments