Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटीचे सुपुत्र जानकर यांची जिल्हा परिषदेच्या लेखा वित्त विभागात सहाय्यक लेखा अधिकारी पदावर पदोन्नती मिळाल्याबद्दल क्रांती ग्रुप मिञपरिवाराच्या वतीने सत्कार

काटी/उमाजी गायकवाड
 तुळजापूर तालुक्यातील काटी येथील रहिवाशी भाऊसाहेब रामलिंग जानकर हे धाराशिव जिल्हा परिषदेत 23 फेब्रुवारी 2004 पासून वरिष्ठ सहाय्यक लेखा व कनिष्ठ लेखा अधिकारी पदावर कार्यरत असून त्यांची 29 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हा परिषदेतील पदोन्नती समितीने केलेल्या शिफारशीनुसार जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील भाऊसाहेब जानकर यांना सहाय्यक लेखा अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.

भाऊसाहेब जानकर यांना सहाय्यक लेखा अधिकारी पदावर पदोन्नती मिळाल्याबद्दल रविवार दि. 31 रोजी दुपारी काटी येथील क्रांती ग्रुप मिञ परिवाराच्या वतीने क्रांती गणेशोत्सव मंडळासमोर त्यांचा शाल,श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.

यावेळी उपसरपंच संपत पंखे, अमर मनोहर देशमुख, अमर मानसिंग देशमुख, अविजित रोडे, अमोल चिवरे, बापु काळे, सचिन इंगळे, पंपू खपाले,महेश जमदाडे,संजय शिंदे,पुरुषोत्तम शिंदे,सचिन परिट, तात्यासाहेब भापकर,शुभम हांडे,वैभव माळी आदी मान्यवर उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज धाराशिव 
मुख्य संपादक 
उमाजी गायकवाड 
9923005236

Post a Comment

0 Comments