काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील दि पिपल मल्टीस्टेट मल्टीस्टेट को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने बुधवार दि.24 रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत काटीचे सुपुञ जुनैद नुसरत नासेर काझी याने 2024 मध्ये दिलेल्या एमपीएससी परीक्षेत राज्य विक्रीकर निरीक्षक व सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO) या प्रशासकीय पदाला पाञ ठरत या दुहेरी प्रशासकीय पदे उत्तीर्ण झाले. व त्याची राज्य विक्रीकर निरीकक्ष (मंञालय) महाराष्ट्र शासन या पदावर निवड झाली. तसेच विशाल विजय खरात याची यांची महावितरण कनिष्ठ सहाय्यक अधिकारी पदावर निवड झाली तर ऐश्वर्या त्रिगुणशील साळुंके यांनी एमबीबीएस डॉक्टर पदवी मिळविल्याबद्दल अर्जुन सुरेश पाटील (दहिवडीकर) यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, नासेर काझी,माजी तंटामुक्ती अध्यक्ष सतीश देशमुख, प्रगतशील शेतकरी प्रदीप साळुंके,प्रकाश गाटे, बाळासाहेब मासाळ, माजी उपसरपंच जुबेर काझी, दि. पिपल मल्टीस्टेटचे कर्मचारी गणेश गाटे, कृष्णा माने आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments