Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काँग्रेसचे युवा नेते हृषीकेश मगर, काटीचे लोकनियुक्त सरपंच सुजित हंगरगेकर,निम्न तेरणा संघर्ष समितीचे प्रमुख जगदीश पाटील यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेना पक्षप्रमुख उध्वव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश


तुळजापूर/उमाजी गायकवाड
आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यात अप्रत्यक्ष भाजप पक्षाला धक्का बसला आहे.भाजपमध्ये गेलेल्या सुनील चव्हाण यांच्या बरोबर न जाता असंख्य कार्यकर्त्यांनी मंगळवारी मुंबई मातोश्री येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. 

काँग्रेसचे युवा नेते ऋषिकेश अशोकराव मगर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस मधील अनेक पदाधिकारी एकञित येत चव्हाण विरोधात बंड पुकारत शिवसेना (उबाठा ) पक्षात मातोश्रीवर जाऊन पक्ष प्रवेश केला. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केल्याने माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्यासह भाजपलाही धक्का बसल्याचे बोलले जात आहे. 

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र तथा जिल्हा बँकेचे संचालक सुनिल चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हा काँग्रेस मधील मोठा गट अस्वस्थ होता. या गटाला भाजप मध्ये आणण्यासाठी भाजपकडून अनेक प्रयत्न झाले. परंतू भाजप बरोबर घरोबा न करता त्यांनी भाजपाला सक्षमपणे विरोध करणाऱ्या व शिवसेना (उबाठा ) गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर व कळंब-धाराशिवचे शिवसेनेचे आमदार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मंगळवार दि. 16रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात प्रवेश केला.
 
यांनी केला शिवसेनेत पक्ष प्रवेश
तालुक्यातील अनेक सरपंच,बाजार समिती संचालक यांच्यासह काँग्रेसचे युवा नेते ऋषिकेश मगर,
काटीचे काँग्रेसचे लोकनियुक्त सरपंच सुजित हंगरगेकर,वडगाव काटीचे सरपंच गौरीशंकर कोडगिरे,उद्योजक मोहन जाधव,वाडीबामणीचे उपसरपंच अमर माने,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामचंद्र ढवळे, कोरेवाडीचे सरपंच श्री.कोकरे,वडगाव लाखचे सरपंच बालाजी चंदनशिवे,माजी सरपंच दिलीप सावंत,शहाजी देवगुंडे, काक्रंबाचे माजी सरपंच प्रभाकर घोगरे,माजी सरपंच श्री.मदने,जळकोटचे उपसरपंच प्रशांत नवगिरे, स्वप्निल शिंदे, उपसरपंच मनोज गायकवाड. सौदागर जाधव, रोहित गवळी,संजय पारवे, दिलीप सावंत, समाधान माने,राजाभाऊ नळेगावकर, शहाजी देवगुंडे,प्रभाकर घोगरे,सिद्धनाथ मदने,सुरेश कोकरे, बालाजी चंदनशिवे,रामचंद्र चंदनशिवे,शत्रुघ्न देवकर, संतोष जटाळ आदींनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला.

पक्ष प्रवेश सोहळ्या दरम्यान यांची प्रमुख उपस्थिती
या पक्ष प्रवेश सोहळ्या दरम्यान खासदार ओमराजे निंबाळकर,आमदार कैलास पाटील यांच्यासह धाराशिव जिल्हा शिवसेना समन्वयक श्याम पवार, धाराशिव जिल्हा शिवसेना संघटक राजअहमद पठाण, जितेंद्र कानडे शिवसेना उपजिल्हाप्रमुख, जगन्नाथ गवळी,शहर प्रमुख राहुल खपले, बाळकृष्ण पाटील,माजी शहर प्रमुख सुधीर कदम,शिवसेना शहर संघटक अर्जुन साळुंखे,चेअरमन सुनील जाधव,चेतन बडगर,बालाजी पांचाळ,कृष्णात मोरे,अनिल छत्रे, नवनाथ जगताप, यांच्यासह तुळजापूर तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थिती होती.

निम्न तेरणाचे लढवय्ये शिवसेनेत 
धाराशिव येथील निम्न तेरणा संघर्ष समितीचे प्रमुख 
जगदीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली गोविंद गरड, विक्रम भोसले,बाळासाहेब पाटील,निखिल वाघमारे यांनी प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी मुकेश पाटील,खंडू शिंदे,दत्ता चव्हाण,नेताजी गायकवाड,अश्विन पाटील, सुभाष कळसुले, बालाजी सगट, मुकेश पाटील, महादेव ढोले, चंदू ताकमोगे,सुधीर गायकवाड, पल्लव पाटील, निखिल वाघमारे,धनराज कुंभार, जैनुद्दीन सय्यद आदि पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्यासाठी संपर्क करा...
Only न्युज धाराशिव
मुख्य संपादक
उमाजी गायकवाड
9923005236

Post a Comment

0 Comments