काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटीसह परिसरात मागील आठवडाभरापासून पावसाने हैदोस घातला असून ढगफुटीसदृश पावसामुळे शेतीत पाणी साचले आहे. काटी परिसरात पावसाचा जोर इतका होता की, खरीप हंगामातील सोयाबीन, मका यासह इतर पिके पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत.ओढे आणि नाल्यांना पूर आल्याने शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास दिवसा व राञभर चाललेल्या या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. काटी गावाजवळील ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहत होते.
सततच्या या पावसामुळे शेतीपिकाचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थकारण उद्ध्वस्त झाले आहे. शेतातील काढणीस आलेल्या सोयाबीन पिकांसह कांद्याच्या पिकालाही पावसाचा फटका बसल्याने कांदा पिकाचीही स्थिती बिकट असून शेतातील पाणी अद्यापही न ओसरण्यामुळे सोयाबीनची मुळे कुजत आहेत. पिकं पिवळी पडली असून उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. यावर कोणताही ठोस उपाय नसल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत आहे. पाऊस थांबत नसल्याने पाण्यास तळ्याचे स्वरुप आले आहे. दरम्यान हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाचा इशारा दिल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरीवर्ग पुर्णपणे कोलमडला असून पावसामुळे आर्थिक संकटात सापडला आहे.
प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यातून होत आहे.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क साधा
Only न्युज धाराशिव
मुख्य संपादक
उमाजी गायकवाड
9923005236
0 Comments