काटी/उमाजी गायकवाड
'वृंदावन फाउंडेशन पुणे' यांच्यामार्फत दिला जाणारा वृंदावन राज्यस्तरीय आदर्श उपक्रमशील शिक्षिका २०२५ हा पुरस्कार 'शिक्षकदिन' निमित्त प्राध्यापिका अनिता अर्जुनराव मोहिते -साळुंके यांना प्रदान करण्यात आला.
त्या शेळगांव हायस्कूल व ज्यु. कॉलेज शेळगांव, ता. बार्शी, जि. सोलापूर. येथे कार्यरत आहेत. सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे प्रकुलगुरु श्री. परागजी काळकर सर, जेजुरी संस्थानचे अध्यक्ष श्री.सौंदडे साहेब, डॉ. रामदासजी चवरे सर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
वृंदावन फाउंडेशनचे अध्यक्ष,पवित्र, महान कार्य करणारे मा. सचिन पाटील सर व संपूर्ण फाउंडेशन टीमचे आभार यांनी व्यक्त केले. शेळगांव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, श्री बाबासाहेब गायकवाड सर,सचिव श्री लक्ष्मणरावजी गायकवाड सर,सर्व संचालक मंडळ, प्राचार्य व शिक्षक वृंद यांनी यांच्या कुशल, निस्वार्थी,उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. पदभुषण डॉ. सायरस पुनावाला ओडिटोरियम पुणे येथे हा दैदिप्यमान सत्कार सोहळा संपन्न झाला.
0 Comments