Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

श्रीमती अनिता अर्जुनराव मोहिते- साळुंके काटीकर यांना वृंदावन आदर्श उपक्रमशील शिक्षिका पुरस्कार प्रदान

काटी/उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील रहिवाशी व सध्या वैराग येथे वास्तव्यास असलेल्या प्राध्यापिका अनिता अर्जुनराव मोहिते -साळुंके यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल पुणे येथील वृंदावन फाऊंडेशनच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त दिला जाणारा वृंदावन आदर्श उपक्रमशिल शिक्षिका पुरस्कार वृंदावन फाऊंडेशन पूणे सावित्रीबाई फुले विद्यापिठाचे प्रकूलगूरू डॉ. पराग काळकर, जेजुरी देवस्थान चे अध्यक्ष श्री सौंदडे साहेब ,डॉ. रामदास चवरे  ,वृंदावन फाऊंडेशनचे अध्यक्ष मा. श्री सचिनजी पाटील सर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

प्राध्यापिका मोहिते-साळुंके या शेळगाव हायस्कूल ज्युनिअर काँलेज शेळगाव ता.बार्शी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थांना दिशा देण्याचे उत्कृष्ट कार्य प्राध्यापिका अनिता अर्जुनराव मोहिते-साळुंके या त्यांच्या सेवा कार्यकाळात करीत आहेत.त्यांच्या कार्याची दखल घेऊन वृंदावन फाऊंडेशनच्या वतीने पुणे येथे पद्मभूषण डॉ.सायरस पूनावाला औडिटोरियम येथे दैदिप्यमान सत्कार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

यावेळी वृंदावन फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी, शिक्षकवृंद, शेळगांव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, श्री बाबासाहेब गायकवाड सर, सचिव श्री लक्ष्मण रावजी गायकवाड सर आणि सर्व संचालक यांनी त्यांच्या कुशल नि:स्वार्थी विविध उपक्रमाबद्दल व त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल अभिनंदन केले.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज धाराशिव 
मुख्य संपायला 
उमाजी गायकवाड 
9923005236

Post a Comment

0 Comments