Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यामध्ये हुतात्मा गणपतराव देशमुख (काटीकर) यांचे अमुल्य योगदान -व्याख्याते संजय भोयटे


     -व्याख्याते संजय भोयटे उपस्थितांना संबोधित करताना....
 
काटी/उमाजी गायकवाड
 तुळजापूर तालुक्यातील काटी येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या प्रागणात गुरुवार दि.11 रोजी  मराठवाडा मुक्ती संग्राम या विषयावर व्याख्याते स्वामी रामानंद तीर्थ विद्यालय हिप्परगा रवा चे मुख्याध्यापक संजय भोईटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

या व्याख्याना प्रसंगी बोलाताना संजय भोयटे यांनी सांगितले की, स्वामी रामानंद तिर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैद्राबाद संस्थानात मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा सुरु झाला होता. मराठवाड्याच्या गावा-गावातून मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा अनेक स्वातंत्र्यी सैनिकांनी शौर्याने लढला. हा केवळ संस्थांनाच्या विलिनीकरणाचा लढा नव्हता तर भारताच्या प्रादेशिक अखंडतेचा लढा होता. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या या आंदोलनात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.या मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी अनेक हुतात्म्यांनी आणि स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या लढ्याचे योगदान अमूल्य आहे, असे प्रतिपादन व्याख्याते संजय भोयटे यांनी केले.
पुढे बोलताना त्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाची पार्श्वभूमी,मराठवाडा मुक्ती संग्राम यावेळी घडलेल्या विविध घटना, मुक्तिसंग्रामामध्ये आपल्या परिसरातील हुतात्म्यांचे योगदान, त्या काळात सर्वसामान्य जनतेवर  वर केलेले अन्याय, निजामाच्या  राजवटी विरुद्ध सामान्य जनतेने राजाविरुद्ध प्रजा,अशा प्रकारचा दिलेला लढा याविषयी सविस्तर माहिती सांगताना काटी परिसरामध्ये हुतात्मा गणपतराव देशमुख यांनी सर्वसामान्य जनतेसाठी ज्वारीचे कोठार उघडून लोकांना मदत केली त्याचप्रमाणे रजाकार चळवळीला विरोध केला.गावाने परिसरातील लोकांची कशाप्रकारे काळजी घेतली.यामुळे त्यांना हौतात्मे  पत्करावे लागले याविषयीचा सविस्तर इतिहास मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अभ्यासक  संजय भोयटे यांनी सांगितले. तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील हुतात्मा गणपतराव देशमुख (काटीकर) यांचे योगदान अमुल्य असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा काटी येथील शिक्षक काशिनाथ धर्मे,बाबू बनसोडे, श्रीमती मनीषा गुंड, स्मिता क्षीरसागर, कांबळे अंजली धुमाळ ,पल्लवी नलावडे,मनीषा माळी,  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलांची या शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी व जिल्हा परिषद प्रशाला शाळेचे मुख्याध्यापक नितीन कोळी, सहशिक्षक नागेश भोसले, सुनील फंड,वैशाली पवार गुरुप्रसाद भुमकर,पंकज काटकर,समिना सय्यद,संध्यारांनी खपाले, प्रगती देशमुख,लुबिनी माळाळे, बालाजी हवाडे,वैशाली मठे,शीतल चोपडे यांच्यासह  इतिहास प्रेमी नागरिक उपस्थित होते.
 
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  सहशिक्षक काशिनाथ धर्मे यांनी केले तर आभार नागेश भोसले मानले.

Post a Comment

0 Comments