Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

शिक्षकांनी विद्यार्थ्यांची बलस्थाने ओळखूनच अध्यापन करावे --- मल्हार माने; वसंत भारती सामाजिक संस्थेच्या वतीने कुंभारी येथे शिक्षकांचा गौरव

मंगरुळ:- चांदसाहेब शेख 
विद्यार्थ्यांतील आंतरीक प्रतिभा,क्षमता आणि गुण ओळखून त्यांच्यातील शिकण्याची उत्सुकता नवनवीन गोष्टी आत्मसात करण्याची क्षमता , नवीन ज्ञान मिळवण्याची जिज्ञासा अशी विद्यार्थ्यांतील बलस्थाने ओळखूनच शिक्षकांने अध्यापन करावे असे आवाहन धाराशिव जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी मल्हार माने यांनी कुंभारी येथे केले.

तुळजापूर तालुक्यातील कुंभारी येथील वसंतभारती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त आयोजित केलेल्या शिक्षकांचा गुणगौरव समारंभात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुंभारीच्या सरपंच वर्षाराणी वडणे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून तुळजापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अर्जन जाधव, धाराशिव बालकल्याण समितीचे अध्यक्ष विजयकुमार माने,वसंत भारती सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा ॲड मैना वडणे,शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत चिलवंते, केंद्रप्रमुख संजय वाले, काटी येथील केंद्रप्रमुख हनुमंत कदम,ॲड विष्णू डोके , खंडू कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.


पुढे बोलतांना मल्हार माने म्हणाले की शिक्षक,बालक आणि पालक यांच्यातील यांच्यात सुसंवाद असणे ही काळाची गरज असुन विद्यार्थ्यांच्या जडणघडणेत याचे खुप महत्व आहे असे ते शेवटी म्हणाले 
    
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालकल्याण समितीचे सदस्य दयानंद काळुंके यांनी केले सुत्रसंचलन विठ्ठल नरवडे यांनी तर आभार सुहास वडणे यांनी मानले 
यासाठी पोलीस पाटील विठ्ठल वडणे,राऊ पाटील, रुक्मीणी वडणे बेबीसरोजा माने, ॲड सुजाता माळी,अनिता काळुंके, व्यंकट वडणे,वैभव वडणे, आकाश वडणे,वास्तव वडणे, सुशांत वडणे,विरज्ञा वडणे यांनी पुढाकार घेतला होता

या गुरजनांचा केला सन्मान
यावेळी सुहास भोसले,रामराज भड,अब्दुलमज्जीद शेख,सागर मोहिते,सावता माळी,अमोल मगर, रमेश सोनवणे, गायत्री ताकमोगे, प्रविण जाधव,अमोल गायकवाड, विजयकुमार गायकवाड,इरशाद शेख,वासंती गायकवाड, विठ्ठल गावीत,पोपट सुरवसे,केदारी इंगळे, नागनाथ वडणे, सुहास वडणे या शिक्षकांचा सन्मानपत्र, सन्मानचिन्ह,शाल,फेटा पुष्पहार देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

Post a Comment

0 Comments