काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील महात्मा फुले शारदीय नवरात्र उत्सव समितीच्या अध्यक्षपदी शाहु बनसोडे तर उपाध्यक्षपदी नवनाथ राउत व विश्वजित ढगे यांची निवड यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील महात्मा फुले नवरात्र उत्सवासमोरील पटांगणात मंडळाचे कार्याध्यक्ष निवृती सोपान भोजने यांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या मंडळातील सदस्यांच्या बैठकीत हि निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारणीत खजिनदारपदी तानाजी हजारे, सहखजिनदार सचिन भोजने, मंदीर खजिनदार अशोक हेडे, भैरीनाथ ढगे यांची निवड करण्यात आली.
महात्मा फुले शारदीय नवरात्र उत्सव समितीचे यंदा हे 44 वे वर्ष आहे. या बैठकीत महात्मा फुले तरुण मंडळ व शारदीय नवरात्र उत्सव समितीच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या आराखड्याची माहिती व बैठकीतील विषयावर सविस्तर चर्चा करुन मुर्ती घटस्थापना, महापुजा व आरती, अन्नदान, मिरवणूक,धार्मिक कार्यक्रम याविषयी माहिती मंडळाचे संस्थापक कार्याध्यक्ष निवृत्ती भोजने यांनी दिली.
या निवड समितीच्या बैठकीत विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या असून प्रत्येकाकडे शारदीय नवरात्र उत्सवाची जबाबदारी दिली आहे. तसेच नवरात्र उत्सव यशस्वी करण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने संस्थापक कार्याध्यक्ष निवृत्ती भोजने व उत्सव समितीचे अध्यक्ष शाहू बनसोडे यांनी केले आहे.
यावेळी मंडळातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments