Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथील "तुळजापूर शुगर" चा पहिला गळीत हंगामातील मोळी पूजन कार्यक्रम उत्साहात संपन्न!

काटी/उमाजी  गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील धाराशिव व सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या काटी-धामणगाव रोडवरील गतवर्षी सुरु झालेल्या वर्षभरातच शेतकरी व शेतमजूर, कामगार,वाहन चालक-मालक व अनेक घटकांच्या विश्वासास पात्र राहुन सर्वांनाच वरदायिनी ठरलेल्या तुळजापूर शुगरचे चेअरमन ऍड.अनिल काळे, कार्यकारी संचालक आदित्य काळे यांच्या कुशल मार्गदर्शनाखालील "तुळजापूर शुगर प्रायव्हेट लिमिटेड गुळ पावडर कारखान्याचा पहिला गळीत हंगाम 2025-26 मधील मोळी पूजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.गतवर्षी तुळजापूर शुगरने प्रथम गळीत चाचणी हंगाम यशस्वीपणे सुरु केला होता.

तुळजापूर शुगर प्रा.लि. कारखान्याचा मोळी पूजन कार्यक्रम ऊस उत्पादक शेतकरी, संचालक यांच्या उपस्थितीत कारखान्याचे चेअरमन ॲड.अनिल काळे,भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विनोद गपाट यांच्या हस्ते ट्रॅक्टर पूजन करून मोळी पूजनाचा व गळीत हंगामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

तुळजापूर शुगरने मागील वर्षी प्रथम चाचणी हंगामात 41000   हजार मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले होते. यंदा 2025-26 च्या गळीत हंगामात 1,50000 लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे  उदिष्ट ठरवले असून कार्यक्षेत्रातील नोंदणी झालेल्या सर्व उसाचे शंभर टक्के गाळप करण्यास कारखाना सज्ज असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी,स्थानिक रोजगार निर्मितीसाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीसाठी तुळजापूर शुगर शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार असल्याचे मत कारखान्याचे चेअरमन ॲड. अनिल काळे यांनी व्यक्त केले.

यावेळी कारखान्याचे चेअरमन ॲड.अनिल काळे, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विनोद गपाट, कार्यकारी संचालक आदित्य काळे,गिरीश देशमुख, ऋषिकेश वडगावकर,सुभाष  साळुंके, बालाजी काळे, श्रीकांत धावणे,ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज धाराशिव 
मुख्य संपादक 
उमाजी गायकवाड 
मो.नं.9923005236

Post a Comment

0 Comments