काटी/ उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटीचे सुपुत्र “डॉ. अतुल डी. ढगे यांना नुकताच दुबई येथे"ग्लोबल लिडर इन मेंटल ॲन्ड सेक्सीव्हल हेल्थ अवेअरनेस 2025" हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रमुख पाहुण्या रेबेका जे. डाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
मानसिक आणि लैंगिक आरोग्य या महत्त्वपूर्ण पण संवेदनशील क्षेत्रात दीर्घकाळ सातत्याने जनजागृती,उपचार,प्रशिक्षण आणि समाजउपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल रत्नागिरी येथील माईंड केअर हॉस्पिटलचे संस्थापक आणि प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ व लैंगिकतज्ज्ञ डॉ.अतुल ढगे यांना ग्लोबल लिडर इन मेंटल ॲन्ड सेक्सीव्हल हेल्थ अवेअरनेस 2025" हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान Saksham International Business Awards 2025 या भव्य समारंभात, हॉटेल अल खोरी स्काय गार्डन, दुबई, UAE येथे देण्यात आला. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी रेबेका जे. डाल, अध्यक्ष –ग्लोबल ॲकॅडिमीक फोरम (GAF), युनायटेड स्टेटस या होत्या.
डॉ अतुल ढगे मुळचे तुळजापूर तालुक्यातील काटी गावचे असून त्यांचे चौथी पर्यंतचे शिक्षण काटी गावत तर पुढील शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर येथे झाले आहे. मागील 12 वर्षापासून ते रत्नागिरी मध्ये माईंड केअर हॉस्पिटल येथे कार्यरत आहेत. डॉ.अतुल ढगे गेल्या अनेक वर्षांपासून मानसिक आणि लैंगिक आरोग्य या दोन्ही क्षेत्रात सामाजिक संवेदना, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि लोकाभिमुख दृष्टीने कार्यरत आहेत. मानसिक आरोग्याविषयी भीती, गैरसमज आणि सामाजिक कलंक दूर करण्यासाठी त्यांनी Mindcare Marathon, माईंडकेअर एक्स्प्रेस, जागर मनोआरोग्याचा उपक्रम, मनोमित्र कार्यशाळा आणि कोविड काळातील सुकून कार्यक्रम असे अनेक प्रभावी उपक्रम राबविले. त्याचबरोबर “Remove Stigma Campaign” मार्फत त्यांनी तरुण, विद्यार्थी, पालक आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत जागरूकतेचा नवा संदेश पोहोचवला आहे.
डॉ.ढगे यांनी मानसिक आणि लैंगिक आरोग्यावर 1000 पेक्षा अधिक लेख विविध नामांकित वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित केले असून मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत शेकडो व्याख्याने, जनजागृती व्हिडिओ, समुपदेशन मालिकांद्वारे ते निरंतर सामाजिक संवाद साधत असतात. NIMHANS, बेंगळुरू येथील प्रोफोशनल स्किल ॲन्ड लिडरशिप ट्रेनिंग 2014 कार्यक्रमासाठी आशियातील केवळ 17 तज्ज्ञांपैकी एक म्हणून त्यांची निवड झाली होती. तसेच त्यांना प्राईड भारत अवार्ड, नवी दिल्ली येथे Most Trusted Psychiatrist & Sexologist – 2024 हा पुरस्कार अभिनेता अर्जुन कपूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता.
लैंगिक आरोग्यावरील गैरसमज दूर करण्यासाठी त्यांनी रेड ॲपल सेक्सीवल वेलनेस क्लिनिक ही भारतातील पहिली discreet sexual wellness service सुरू केली असून गोपनीय, सुरक्षित आणि वैज्ञानिक मार्गदर्शनाची नवी दिशा त्यांनी निर्माण केली आहे.
या आंतरराष्ट्रीय सन्मानाबद्दल बोलताना डॉ. ढगे म्हणाले, “ही जागतिक मान्यता माझ्या रुग्णांची, माईंडकेअर टीमची आणि समाजासाठी मानसिक व लैंगिक आरोग्य सेवेत विश्वास ठेवणाऱ्या सर्वांची आहे. या नव्या सन्मानानंतर या कामाबाबत माझी जबाबदारी वाढली आहे ववचनबद्धता आणखी दृढ झाली आहे.”
डॉ. अतुल ढगे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज धाराशिव
मुख्य संपादक
उमाजी गायकवाड
मो.नं.9923005236
0 Comments