काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील भिमनगरमधील बुध्द विहारमध्ये संत गाडगेबाबा यांच्या 69 व्या पुण्यतिथीनिमित्त विविध उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
तत्पूर्वी दलित मित्र नंदू बनसोडे यांनी उपस्थितांचे स्वागत करुन संत गाडगेबाबा यांच्या कार्याची थोडक्यात ओळख करून देताना सांगितले की,गाडगेबाबा हे एक वैज्ञानिक दृष्टिकोन लाभलेले प्रसिध्द समाजसुधारक होते. दीन-दलित आणि पीडितांच्या सेवेसाठी तसेच समाजातील अज्ञान, अंधश्रध्दा, भोळ्या समजुती, अनिष्ट रुढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. ते गावोगावी जाऊन कीर्तन-प्रबोधनाच्या माध्यमातून सामाजाला जागृत केले.त्यांनी समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले व स्वच्छता आणि चारित्र्याची शिकवणही दिली. म्हणून आजही त्यांचे कार्य प्रेरणादायी व आदर्शवत असल्याचे सांगून सर्वांनी त्यांच्या कार्याचा आदर्श आपल्या डोळयासमोर ठेवावा असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.
यावेळी दलित मित्र नंदू बनसोडे,मुंबई मंत्रालयाचे कर्मचारी शेषप्पा बनसोडे,मल्लिकार्जून राजगुरु, सोजरबाई बनसोडे,सोहम बनसोडे,अंकीता बनसोडे,
अनुसया बनसोडे,जयसिंग सुरवसे,ऋषिकेश राऊत, विलास डोळसे,सुरेश बनसोडे,रवि डोळसे,दादाराव भोसले,सागर वाघमारे,उंबराबाई साबळे, कंमळाबाई सुरवसे,राजाबाई बनसोडे,निखील साठे,दिनेश डोळसे, धनराज बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज धाराशिव
मुख्य संपादक
उमाजी गायकवाड
मो.नं.9923005236
0 Comments