तुळजापूर:-गणित प्रकल्पाचे प्रदर्शन, सेमिनार, गणित प्रश्नमंजुषा आदि विविध उपक्रमांनी श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये गणित दिन साजरा करण्यात आला. शेवटी विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले.
प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार नन्नवरे व उपप्राचार्य संतोष घारगे यांच्या हस्ते गणित प्रकल्प प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी पर्यवेक्षक मोहन शिंदे गणित विभाग प्रमुख जीवन पाटील, गणित शिक्षिका ज्योती शिंदे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकात ज्योती शिंदे यांनी गणित दिनाचे महत्त्व सांगितले. यानंतर मानसी सोनटक्के, ज्ञानेश्वरी पाटील, अनुष्का मोरे, प्रेम ओहाळ, सानवी भोसले, शुभम सुरवसे आदी विद्यार्थ्यांनी गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या विषयी माहिती सांगितली.
प्राचार्य ननवरे व उपप्राचार्य घारगे यांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. गणित शिक्षक ज्योती शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी सिध्दार्थ गायकवाड, आर्यन पवार, वाणी चंदणे, प्राची सारोळकर, सौरभ राठोड, संध्या डोईफोडे आदि विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले.कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह गणित शिक्षकांची उपस्थिती होती.
मान्यवरांचा हस्ते गौरव....
अनुष्का मोरे, नंदिनी नाईक, अक्षता कांबळे, अक्षरा कांबळे,श्रद्धा परीट यांना गणित प्रकल्पामध्ये तर सुहानी कागदे, प्रेम ओहाळ, संजना फुलसुंदर, वेदांती रणखांब, कृष्णा वीर,अनुष्का मोरे, मानसी सोनटक्के यांना उत्कृष्ट सेमिनार बद्दल मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
0 Comments