मुरुम/ प्रतिनिधी
श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात सोमवार दिनांक 22 डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. संजय अस्वले यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. पद्माकर पिटले, उपप्राचार्य प्रा. जी. एस. मोरे, पर्यवेक्षक शैलेश महामुनी आणि गणित विभाग प्रमुख डॉ . व्ही. एम. गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी रामानुजन यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत गणित ही केवळ आकड्यांची गणना नसून, ती तर्कशक्ती, सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याची कला असल्याचे स्पष्ट केले. आजच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात गणिताचे महत्त्व अधिक वाढले असून, स्पर्धा परीक्षा, संशोधन, अभियांत्रिकी, अर्थशास्त्र आणि संगणक क्षेत्रात गणिताचा मूलभूत वाटा आहे, असे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना प्राचार्य डॉ. अस्वले म्हणाले,
“श्रीनिवास रामानुजन यांचे जीवन हे जिद्द, चिकाटी आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे. मर्यादित साधनसामग्री असूनही त्यांनी जागतिक स्तरावर भारतीय गणिताचा ठसा उमटवला. विद्यार्थ्यांनी रामानुजन यांच्याकडून प्रेरणा घेऊन अभ्यासात सातत्य ठेवावे, प्रश्न विचारण्याची सवय लावावी आणि गणिताकडे भीतीने नव्हे तर जिज्ञासेने पाहावे. गणित विषय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण बौद्धिक विकासासाठी अत्यंत उपयुक्त आहे.”
याप्रसंगी गणित दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील करिअर कट्टाच्या वतीने AWS Cloud computing course हा केवळ 22 मिनिटात व्हिडिओ द्वारे प्रशिक्षण घेऊन प्रमाणपत्र मिळवणे हा उपक्रम घेण्यात आला. उपपक्रमात एनएसएस, एनसीसी आणि करिअर कट्टाचे विद्यार्थी सक्रिय सहभागी होऊन याप्रमाणपत्र प्रशिक्षणाची माहिती इतरांना दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील कार्यक्रम अधिकारी डॉ. भारत शेळके, कॅप्टन डी. एस. चितमपल्ले, डॉ. विनोद देवरकर, डॉ. अशोक पदमपल्ले, डॉ. समाधान पसरकल्ले, डॉ. अर्जुन कटके, डॉ. चंद्रसेन करे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. समाधान पसरकले यांनी केले तर डॉ. व्ही. एम. गायकवाड यांनी आभार मानले
0 Comments