काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील किसनराव साळुंके यांच्या सुनबाई प्राध्यापिका योगगुरू श्रीमती अनिता अर्जूनराव मोहिते यांना 'क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फूले आदर्श गूणवंत शिक्षिका पूरस्कार 2025 बार्शी येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. त्या शेळगाव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
शैक्षणिक व योग क्षेत्रातील उत्कृष्ट उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना पुरस्कृत करण्यात आले.संभाजी ब्रिगेड-मराठा सेवा संघ बार्शी आयोजित जिल्हा स्तरीय पूरस्कार वितरण सोहळा शिवाजी महाविद्यालय ग्रंथालय हॉल बार्शी येथे संपन्न झाला.अध्यक्षस्थानी डॉ.यादव तर पूरस्कार वितरण माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील व शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत,प्रसिद्ध व्याख्याते प्रा. हनुमंत पवार ,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री आनंद काशीद यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी प्रा.अनिता मोहीते-साळुंके यांनी आनंद काशीद आणि संभाजी ब्रिगेडच्या संपूर्ण टिमचे कृतज्ञता पूर्वक आभार मानले.
प्रा.श्रीमती मोहीते-साळुंके यांना मिळालेल्या पुरस्कार आणि त्यांच्या समर्पित कार्याबद्दल शेळगांव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बाबासाहेब गायकवाड,सचिव लक्ष्मणराव गायकवाड, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य श्री शिंदे, पर्यवेक्षक बाळासाहेब साळुंके, आणि सर्व शिक्षक सहकारी,विद्यार्थी व काटी परिसरातून कौतुक होत आहे.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज धाराशिव
मुख्य संपादक
उमाजी गायकवाड
मो.नं.9923005236
0 Comments