मुरूम/प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे तीन जानेवारी वार शनिवार रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य उल्हास घुरघुरे,प्रमुख पाहुणे ज्येष्ठ प्रा.संजय गिरी सर प्रमुख वक्ते प्रा.उमाकांत महामुनी सर यांची उपस्थिती होती.
मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि सावित्रीबाईंच्या कार्यावर आधारित भाषणे आयोजित केली जातात.'बालिका दिन': महाराष्ट्रात मुलींसाठी विशेषतः 'बालिका दिन' म्हणून हा दिवस साजरा होतो.
१८ व्या शतकात महाराष्ट्रात महिला शिक्षण आणि समाजसुधारणेचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची शनिवारी 195 वी जयंती साजरी होत आहे. महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे दाम्पत्य १८ व्या शतकात समाजाचा मोठा विरोध पत्कारत स्त्री-शिक्षणासाठी केलेल्या कार्यासाठी ओळखले जाते. सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे ३ जानेवारी १८३१ रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. त्यानंतर महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिबा फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली.
यावेळी सावित्रीच्या लेकी प्राध्यापिका यांचा सन्मान करण्यात आला.प्रा.उण्णद रेखा रमेश, प्रा.कु.सरस्वती तपसाळे, प्रा.माधुरी नरगिडे प्रा. कु.साक्षी महामुनी
शाळेतील विद्यार्थिनी यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकण्यात आला.
प्रिती म्हाळाप्पा बेळे, सोनाली बंडाप्पा धुम्मा, मनिषा मार्तंड कांबळे, लक्ष्मी विष्णू कोठे, ज्ञानेश्वरी संजय सुरवसे, अंजली संजय कांबळे,भाग्यश्री रामचंद्र उडचने, वैष्णवी संजय रुपनुरे, बुशारा शेख, श्रद्धा विठ्ठल मळशेट्टी.मयुरी राठोड,
या वेळी प्रमुख वक्ते प्रा.उमाकांत महामुनी सावित्री बाई फुले यांचा जीवन परिचय आढावा त्यांनी विद्यार्थी समोर मांडले...इ.स. १८९६ साला तल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्यचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्री करणाऱ्या बाया - बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले.
इ.स. १८९६-९७ दरम्यान पुणे व परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेत होता. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेग पीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्री बाईं नाही प्लेग झाला. त्यातून मार्च १०, इ.स. १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.
सावित्रीबाई नी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथांना आश्रय मिळवा हेही त्याचे कार्यक्षेत्र होते. सामजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. त्यामुळेच 1896 दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले . पुढे १८९७ मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतः च्या प्रकृती चीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले . दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाच्या बळी ठरल्या.
यावेळी प्रा.संजय गिरी,प्रा.नाकाडे सुधीर शेषराव, प्रा.सोलंकर नारायण त्र्यंबक,प्रा. रामपूरे सतिश नामदेव,प्रा.सुर्यवंशी अजित सुर्यकांत,प्रा.बंडगर बिभीषण दत्तात्रय,प्रा.अंबर विश्वजीत चंद्रकात, प्रा.राठोड दयानंद लक्ष्मण, प्रा.धर्माधिकारी राघवेंद्र शामाचार्य, प्रा. गायकवाड अमोल मनोहर,प्रा.वाकडे रत्नदीप राजेंद्र, प्रा.जमादार सलीम गणी, प्रा.राठोड अजित मोतीराम, प्रा.कु.उण्णद रेखा रमेश,प्रा.सरस्वती तपसाळे, प्रा.माधुरी नरगिडे,प्रा. संगशेट्टी महेश, प्रा.कु.महामुनी साक्षी संजय,फिरोज कागदी,राजू कोळी,धनराज कांबळे आदींची उपस्थिती होती.
सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु .जाधव सोनाली प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.सतिश रामपुरे आणि शेवटी विद्यार्थिनी आभारप्रदर्शन कु.श्रद्धा लुटे यांनी मानले ..
0 Comments