Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

महाराष्ट्र पोलीस दिनानिमित्त रोटरी क्लब कडून पोलिसांचा सत्कार

मुरूम/वार्ताहर
महाराष्ट्र पोलीस दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब मुरूम सिटीच्या वतीने मुरूम येथे पोलिसांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरूम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. दहिफळे हे होते.
या वेळी प्रमुख अतिथी म्हणून रोटरी क्लब मुरूम सिटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक गव्हाणे साहेब व पोलीस उपनिरीक्षक गाडेकर साहेब उपस्थित होते. या प्रसंगी पोलीस ठाणे मुरूम येथिल सर्व पोलिस कर्मचाऱ्यांचे सत्कार करण्यात आले.

कार्यक्रमाची प्रस्तावना करताना प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी यांनी समाजाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या पोलीस बांधवांच्या कार्याचे कौतुक केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. दहिफळे यांनी पोलीस दलाची जबाबदारी व समाजातील त्यांचे महत्त्वपूर्ण स्थान यावर सविस्तर माहिती दिली. तर गाडेकर साहेब यांनी पोलिसांनी केलेल्या चांगल्या कार्याची समाजाने दखल घ्यावी तसेच समाजामध्ये पोलिसांचे स्थान अधिक उंचावणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.
याप्रसंगी पोलीस ताई दीपाली लोखंडे यांनीही आपले मनोगत व्यक्त करून पोलीस सेवेत येणाऱ्या अनुभवांची माहिती दिली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुनील राठोड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भूषण पाताळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

या सत्कार समारंभासाठी पोलीस ठाणे येथील सर्व पोलिस कर्मचारी,रोटरी क्लब मुरूम सिटीचे सदस्य डॉ. नितीन डागा, उपप्राचार्य कल्लया स्वामी, प्रकाश रोडगे, शिवकुमार स्वामी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहात व सन्मानाच्या वातावरणात पार पडला.

Post a Comment

0 Comments