मुरुम /प्रतिनिधी
जि. प.स्पेशल प्राथमिक शाळा भीमनगर मुरुम येथे सावित्रीबाई फुले जयंती दिनानिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्ष निर्मलकुमार जगन्नाथ लिमये, प्रमुख अतिथी सुमनबाई कांबळे, तर प्रमुखउपस्थिति मुख्याध्यापिका प्रमिला तुपेरे,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष शिवराज कांबळे , सदस्या नाजिया मडे,श्वेता गायकवाड, गौराबी नदाफ, रेश्मा मुरुमकर, भौरव्वा साखरे,स्नेहल गोडबोले,अश्विनी कांबले,रेश्मा गायकवाड़,आरती कांबले,लक्ष्मी सागर, बंकलगी, आदिती कांबळे, सपना कांबळे,जितेंद्र गायकवाड,जयपाल सुरवसे,विष्णू गायकवाड, सौफियान मुजावर बहुसंख्येने पालक आदि उपस्थित होते.यावेळी शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्ष निर्मलकुमार जगन्नाथ लिमये यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन पर मार्गदर्शन केले, सावित्रीबाई फुले यांच्या जीवन व कार्याची माहिती विद्यार्थ्यांनी भाषणातून व्यक्त केले. सावित्री तू शिक हे नाटक, आम्ही सावित्रीच्या मुली काव्य नाट्य, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती काय नृत्य, सावित्री फुले वानी तुम्ही व्हावे धनवान प्रबोधन पर गीत सादरीकरण करून सर्वांची मने जिंकली. पालक सभेत शाळेच्या दैनंदिन अभ्यासक्रमासह विविध स्पर्धा व उपक्रम संबंधी विषयावर पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला. रुपचंद ख्याडे सरांनी 7 ते 8या वेळेत सर्वांनी टीव्ही व मोबाईल बंद ठेवून विद्यार्थी अभ्यासाला बसवण्याचे आव्हान केले. निर्मलकुमार जगन्नाथ लिमये यांनी त्यास अनुमोदन दिले. पालकांनी हात उंचावून सर्वानुमते ठराव संमत केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवाजी गायकवाड, आशालता शिवकर,राजेश गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंगद थिटे सूत्रसंचालन रुपचंद ख्याडे व आभार प्रमिला तुपेरे यांनी मानले.
0 Comments