तुळजापूर:- नुकत्याच झालेल्या पुणे येथे 25 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लेवल स्मार्ट अबॅकस स्पर्धेत तुळजापूर येथील स्पर्धेत स्मार्टअस अबॅकस क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश मिळवत यंदाही यशाची परंपरा कायम राखली.
पुणे येथे झालेल्या स्मार्ट अबॅकस राष्ट्रीय लेवल 2025 च्या ऑफलाईन स्पर्धेत तुळजापूर सेंटरचा कुमार राजवी विठ्ठल लोड इयत्ता दुसरी याने नऊ मिनिटात 150 पैकी 150 गणिते बरोबर सोडवून देशात प्रथम क्रमांक मिळवत सायकल, ट्रॉफी मेडल,सर्टिफिकेट असे बक्षीसे मिळवली तर कुमार विहान तानाजी बागल याने यावर्षी देशात चौथा क्रमांक मिळवत दैदिप्यमान यश संपादन करत सलग तिसऱ्या वर्षीय यशाची हॅट्रिक साधली. विहानने सन 2023-24 च्या स्पर्धेत देशात दुसरा क्रमांक मिळवला तर सन 2024-28 च्या राष्ट्रीय लेव्हल स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत लॅपटॉप,सायकल,मेडल, ट्रॉफी आदी बक्षिसे मिळवली. तसेच शुभांगी बागल यांच्या तामलवाडी सेंटर मधून या स्पर्धेत कुमारी सिद्धी शैलेश गुत्ती हिने देशात पाचवा क्रमांक मिळवत तामलवाडीचेही नाव देशात झळकवले. शुभांगी मॅडमच्या तुळजापूर व तामलवाडी सेंटर मधून 47 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या सर्व स्पर्धकांना सेंटरच्या संचालिका सौ. शुभांगी तानाजी बागल यांनी दोन महिने अथक प्रयत्न व परिश्रम घेऊन मुलांना यशापर्यंत नेऊन दैदीप्यमान यश मिळवले. या दैदिप्यमान यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तुळजापूर तालुक्यासह जिल्हाभरातुन कौतुक होत आहे. तसेच नवीन वर्षा निमित्त स्मार्टअस अबॅकस क्लास लोहिया विभाग तुळजापूर मध्ये प्रथम प्रवेश घेणाऱ्या 21 विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत तरी इच्छुकांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन संचालिका शुभांगी बागल यांनी केले आहे.
ताज्या बातम्या संपर्क करा... only न्युज धाराशिव
मुख्य संपादक:-उमाजी गायकवाड,9923005236

0 Comments