Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

53 व्या जिल्हास्तरीय विज्ञान, गणित व पर्यावरण प्रदर्शनाचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न; विकसित व आत्मनिर्भर भारतासाठी STEM संकल्पनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

तुळजापूर/उमाजी गायकवाड 
राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर, शिक्षण विभाग जिल्हा परिषद धाराशिव, धाराशिव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ व श्री.तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 53 व्या जिल्हास्तरीय बाल वैज्ञानिक विज्ञान, गणित व पर्यावरण तसेच अध्यापक शैक्षणिक साहित्य निर्मिती प्रदर्शनाचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापूर येथे उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धाराशिवचे प्राचार्य डॉ.दयानंद जटनुरे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन, श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट, तुळजापूर श्रीमती माया माने, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती सुधा साळुंके,उपशिक्षणाधिकारी दिनकर होळकर व संतोष माळी,जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक भारत देवगुडे, प्राचार्य वैजनाथ घोडके,धाराशिव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र स्वामी, परीक्षक प्रतीक शिंदे, डॉ.अशोक हुंबे, डॉ.नितीन पाटील,श्रीनिवास कदम, अमोल शिंगटे, श्रीमती हराळकर, तालुकाध्यक्ष लक्ष्मण पाटील,आर.आर.गायकवाड, प्रकाश मगर आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थित होती.

यावेळी अध्यक्षीय भाषणात डॉ. दयानंद जटनुरे यांनी, “विज्ञान प्रदर्शन म्हणजे केवळ स्पर्धा नसून विद्यार्थ्यांमधील जिज्ञासा, सर्जनशीलता आणि संशोधनवृत्तीला चालना देणारे व्यासपीठ आहे. STEM शिक्षणाच्या माध्यमातून समस्या सोडविण्याची दृष्टी विकसित होऊन विद्यार्थी आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत सक्रिय सहभाग घेतील,” असे प्रतिपादन केले.

प्रमुख पाहुण्या श्रीमती माया माने म्हणाल्या, “विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रकल्प समाजाच्या गरजांशी निगडित असून पर्यावरण संवर्धन, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचा सुंदर संगम येथे दिसतो. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही राष्ट्रीय पातळीवर संधी उपलब्ध होत असल्याचे सांगितले.

शिक्षणाधिकारी श्रीमती सुधा साळुंके यांनी विद्यार्थ्यांनी जिज्ञासा जोपासत चरित्रात्मक व प्रेरणादायी पुस्तकांचे वाचन करून वैज्ञानिक जाणीव वाढवावी, तसेच अशा प्रदर्शनांतून समाजोपयोगी नवकल्पना साकार होतात, असे नमूद केले.

या प्रदर्शनात प्राथमिक गटातून 23 विद्यार्थी, प्राथमिक दिव्यांग गटातून 4 विद्यार्थी, प्राथमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य गटातून 7 शिक्षक, माध्यमिक गटातून 24  विद्यार्थी, माध्यमिक दिव्यांग गटातून 5 विद्यार्थी तसेच माध्यमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य गटातून 4 शिक्षक अशा एकूण 60 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सादर केलेल्या नावीन्यपूर्ण प्रकल्पांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.

53 व्या जिल्हास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनात यांचा झाला सन्मान...

53 व्या जिल्हास्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनातील पुढील प्रमाणे विजेते व राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड झालेल्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले – 
स्पर्धेतील विजेते...
प्राथमिक शिक्षक गट :प्रथम – संदीप तुळशीदास पालवे, जयहिंद विद्यालय,कसबे तडवळे,उत्तेजनार्थ – श्रीमती पुष्पलता मोहनराव पांढरे, प्राथमिक शाळा, जगदंबा नगर,कडदोरा,
विद्यार्थी दिव्यांग प्राथमिक गट प्रथम 
– ओम गणेश गांगर्डे व संस्कार सुरेश शेंडकर, माणिबाबा विद्यालय,शेळगाव,उत्तेजनार्थ – श्रद्धा श्रीकांत कांबळे,सई वाजीबा घोरपडे, कै.जोशी स्मारक विद्यालय, येणेगुर, विद्यार्थी प्राथमिक गट :प्रथम – संघरत्न सुभाष नगरे, छत्रपती शिवाजी विद्यालय, धाराशिव,द्वितीय – हिंदवी अमोल कचरे व वरद मालपानी, शारदा इंग्लिश स्कूल,कळंब,तृतीय – प्रगन्य श्रीराम पवार व ऋतुराज अंगद घोगरे, जि. प. प्राथमिक शाळा, जवळा खुर्द, उत्तेजनार्थ – आर्या कागे, योगेश्री कुलकर्णी, डॉ. के. डी. शेंडगे इंग्लिश स्कूल, उमरगा,उत्तेजनार्थ – नारायण संदीप मासाळे, जि.प.प्रा.शाळा,कसगीवाडी,
माध्यमिक शिक्षक गट प्रथम – पुनम गौतम चेडे, जे. आय. आर. टी. तंत्र प्रशाला,वाशी,
उत्तेजनार्थ – दीपक आत्माराम राऊत, श्री शरदचंद्रजी पवार विद्यालय, खोंदला,
विद्यार्थी दिव्यांग माध्यमिक गट प्रथम
 – करुणा रामा कांबळे, निवासी दिव्यांग शाळा, सास्तुर,उत्तेजनार्थ – ईश्वरी शेखर छत्रे, भैरवनाथ माध्यमिक विद्यालय,तीर्थ खुर्द,
विद्यार्थी माध्यमिक गट प्रथम 
सादिया युसुफ मुल्ला, श्री सिद्धेश्वर विद्यालय, कसगी,द्वितीय – वैष्णवी बालाजी काळे, जिल्हा परिषद प्रशाला,मुळज,तृतीय – वरूण समीर धर्म, आर्य चाणक्य विद्यालय,धाराशिव,उत्तेजनार्थ – एकंडे वैष्णवी गजेंद्र, जयप्रकाश माध्यमिक विद्यालय,रुईभर,उत्तेजनार्थ – राशी हनुमंत खोत, सुबोध विद्यामंदिर,तेरखेडा याप्रसंगी विज्ञान प्रदर्शन आयोजन समितीमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षणाधिकारी संतोष माळी यांनी केले. सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपशिक्षणाधिकारी दिनकर होळकर यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज धाराशिव 
मुख्य संपादक 
उमाजी गायकवाड 
मो.नं.9923005236

Post a Comment

0 Comments